आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uttarakhand Avalanche Destroys 2 Power Plants That Are Dangerous To The Environment; 150 People Were Carried Away

7 वर्षांनंतर केदारनाथसारखा प्रलय:हिमकडा तुटल्याने पर्यावरणासाठी धोकादायक ठरलेले 2 वीज प्रकल्प नष्ट; 150 लोक वाहून गेले

डेहराडून6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केदारनाथ दुर्घटनेच्या ७ वर्षांनी उत्तराखंडातील डोंगरांचा संयम पुन्हा सुटला. या वेळी एक हिमकडा कहर घेऊन आला. हिमकड्याच्या मुखाजवळच धरण बांधले तर हेच होणार. धरणासाठी भुयारे केली जात आहेत. स्फोट केले जात आहेत. स्फोटांमुळे हिमकड्याला तडे गेल्याची भीती आहे. हा हिमकडा नदीत कोसळला. तलाव तयार झाला. तलावालगतचे धरण फुटताच विनाश आला. धरणाच्या बांधकामासाठीचे ढिगारे नदीकाठी जमा करण्यात आले होते. तो ढिगारा नदीत वाहत गेल्याने अधिक विनाश झाला. सामान्यपणे थंडीत हिमकडे कोसळत नाहीत. यामुळे हे नैसर्गिक नव्हे, तर मानवी संकट आहे. नंदादेवी सुरक्षित क्षेत्र आहे. २०१९ मध्ये स्थानिकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती की, ज्या पद्धतीने येथे धरणाचे काम सुरू आहे त्यामुळे परिसरात तलाव तयार होत आहेत. यामुळे कधीही पूर येऊ शकतो. शेवटी रविवारी सकाळी तसेच झाले.

हिमकड्याचे पाणी ऋषिगंगा नदीतून वेगाने पुढे वाहत गेले. सर्वात आधी भारत-चीन सीमेला जोडणारा पूल वाहून गेला. मग ९५% काम पूर्ण झालेला ऋषिगंगा विद्युत प्रकल्प उद्ध्वस्त केला. येथे काम करत असलेल्या १५० जणांना वाचवायला वेळही मिळाला नाही. ते वाहून गेले. पुराचे रूप धारण केलेले पाणी तपोवन विद्युत प्रकल्पाला चिरडत पुढे गेले. येथे टनलचे काम करणारे १६ मजूर त्यातच अडकले. दोन तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली. मात्र, ऋषिगंगातून बेपत्ता झालेल्यांपैकी केवळ १० जणांचेच मृतदेह सापडू शकले. तपोवनमध्ये विनाश केल्यानंतर पुराचा वेग कमी झाला. श्रीनगर, धारी देवी, देवप्रयाग व इतर भाग रिकामा करण्यात आल्याने नुकसान झाले नाही. श्रीनगर धरण आणि ऋषिकेश धरण खाली करण्यात आले. टिहरी धरणातही पाणी नियंत्रणात आणण्याची तयारी होती, मात्र तिथपर्यंत विनाशाची धग पोहोचली नाही. २०१३ मध्ये केदारनाथ अपघातानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून उत्तराखंडात एक समिती स्थापन झाली होती. समितीला राज्यातील बांधकाम सुरू असलेल्या ८० विद्युत प्रकल्पांचा आढावा घ्यायचा होता. अहवालात म्हटले होते की, ऋषिगंगा प्रकल्पाच्या परिसरात असलेल्या हिमकड्यांचा अभ्यासानंतरच प्रकल्प पुढे सुरू ठेवावा. मात्र, असे झाले नाही.

बचाव कार्यास झाली सुरुवात...
- पुरात वाहून गेलेल्या सुमारे १५० लोकांच्या शोधासाठी ५ हजारांवर बचाव कर्मचारी काम करत आहेत.
- एनडीआरएफचे डीजी एस.एन. प्रधान यांनी सांगितले की, चमोली, जोशीमठ आणि इतर क्षेत्रात बेपत्ता असलेल्या लोकांना शोधण्यासाठी ८ पथके तैनात करण्यात आली आहेत.
- लष्कराचे ६०० जवान पोहोचले आहेत. ऋषीकेशजवळील लष्करी केंद्राने बचाव मोहीम सुरू केली आहे.
- हवाई दलाचे २ एमआय-१७ व १ एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर एअर लिफ्टच्या कामात तैनात आहेत.
- आयटीबीपीच्या २०० जवानांचे अतिरिक्त पथकही बचाव कामात सहभागी आहे.
- एसडीआरएफचे ५०० जवान शोध कार्यात सहभागी आहेत.

महिलांच्या किंचाळण्याने परिसर गेला हादरून : प्रत्यक्षदर्शी
‘सकाळचे १० वाजले असतील नाष्टा झाला. ऊन खात बसलो होतो. अचानक स्फोटासारखा आवाज झाल्याने तपोवन खोऱ्यात खळबळ माजली. महिलांच्या किंचाळण्याचा आवाज होता व खाली ऋषिगंगा नदीत भूकंप आला होता. नदीच्या पृष्ठभागावर हिमवादळ आले होते, तर जणू आभाळ फाटून खोऱ्यात पडले आणि हिमखंडाचे तुकडे आकाशाकडे उसळी मारत असल्याचे चित्र होते. समोरील पहाडावरून हिमखंड गतीने घसरत नदीत पडत होते. यावरून त्यांच्यात कुठली स्पर्धा लागली की काय असे वाटत होते.

हे खूपच मोठे हिमस्खलन होते. त्यामुळे नदीत प्रलयंकारी लाटा आणि तीव्रता निर्माण झाली. पाहता पाहता वीज प्रकल्प व तेथे काम करणारे मजूर गायब झाले. ऋषिगंगा नदीत पडलेल्या हिमखंडांनी सर्वात आधी भुयारांचे मोठे नुकसान केले. त्यानंतर प्रकल्पास याचा फटका बसला. भुयारातील मलबा धरणात पडला आणि तलावातील पाण्याची पातळी अचानक वाढली व भिंती उद्््ध्वस्त झाल्या. गाळ धौली गंगा नदीवरील वीज प्रकल्पात घुसला. येथे १५० मी. खोल तलावाची पातळी वाढली.

बातम्या आणखी आहेत...