आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तराखंडच्या चमोलीमध्ये आलेल्या आपत्तीने बर्याच प्रमाणात विनाश केला. जिथे पाहाल तिथे फक्त ढिगारा दिसत आहे. कामावर गेलेले अनेक लोक अद्याप आपल्या घरी पोहोचले नाहीत. कालपासून, प्रत्येकाच्या नातेवाईकांचे लक्ष या ढिगाऱ्यांवर आहे, जेथे ITBP चे जवान बचावकार्यात गुंतलेले आहेत आणि IPS अधिकारी अपर्णा कुमार या पथकाचे नेतृत्व करीत आहेत.
सरकारने उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या बचाव मोहिमेची धुरा अपर्णा यांच्याकडे सोपविली आहे. अपर्णा ITBP च्या DIG आहेत, मात्र पण त्यांची वैशिष्ट्ये अशी आहेत की कोणीही हैराण होतील. कर्नाटकातील शिवमोगा येथील रहिवासी असलेल्या अपर्णा 2002 कॅडरच्या IPS अधिकारी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण कर्नाटकात झाले. त्यानंतर त्यांनी BA-LLB चे शिक्षण घेतले. अपर्णा यांचे पती संजय कुमार देखील उत्तर प्रदेश कॅडरचे IAS अधिकारी आहेत.
अपर्णा कुमार जगातील 7 सर्वात उंच शिखरांवर तिरंगा फडकावणाऱ्या पहिल्या IPS अधिकारी आहेत. त्यांनी माउंट एव्हरेस्ट, माउंट किलीमांजारो, एल्ब्रुस, कार्सटेंस पिरॅमिड, विन्सन मॅसिफ, माउंट एकांकागुआ आणि माउंट डेनालीवर चढाई करण्यात यश मिळवले आहे. ही सर्व 7 शिखरे 7 वेगवेगळ्या महाद्विपांमध्ये आहेत.
39 वर्षांची झाल्यावर गिर्यारोहणाला सुरुवात केली
अपर्णा यांनी आपल्या आयुष्यात पहिल्यांदा 2002 मध्ये बर्फाच्छदित पर्वत पाहिले. त्या सांगतात की, त्यावेळी त्या मसूरीमध्ये प्रशासकीय सेवाचे प्रशिक्षण घेत होत्या. तेव्हाच गिर्यारोहण करण्याचे त्यांनी ठरवले. मात्र आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी 11 वर्षे लागली. 2013 मध्ये त्यांनी माउंटेनियर फाउंडेशनचा कोर्स केला. तेव्हा त्यांनी वयाची 39 वर्षे पूर्ण केली होती.
2014 पासून शिखरे सर करण्यास केली सुरुवात
अपर्णा यांनी गिर्यारोहणाचा कोर्स पूर्ण केल्याच्या एक वर्षानंतर 2014 मध्ये पहिल्यांदाच आफ्रिकेलातील सर्वात उंच शिखर किलिमंजारो (19,340 फूट) सर केले. याचवर्षी ऑस्ट्रेलिया आणि ओशिनियातील सर्वात उंच पर्वत कार्सटेंस पिरॅमिड (16,024 फूट) सर केले.
2015 मध्ये अर्जेंटीनामधील सर्वात उंच पर्वत एकॉनकागुआ (22,840 फूट)च्या शिखर सर केले. याचवर्षी रशियातील कोकेशियान रेंजचे सर्वात उंच पर्वत माउंट एल्ब्रुस (18,510 फूट) वर देखील चढण्यात यश मिळवले. 2016 मध्ये अंटार्कटिकातील सर्वांत उंच पर्वत विन्सन मासिफ (16,050 फूट) वर चढाई केली. याचवर्षी जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर केले. ती येथे 23 हजार फूट उंचीवर पोहोचण्यात यशस्वी झाली.
2019 मध्ये उणे 40 अंश तापमानात दक्षिण ध्रुवावर ठेवले पाऊल
अपर्णा यांनी 2017 मध्ये नेपाळमधील जगातील आठवे सर्वोच्च शिखर असलेल्या मानसलू माउंटवर तिरंगा फडकावला. अपर्णा दक्षिण ध्रुवावर पोहोचणाऱ्या पहिल्या भारतीय अधिकारी आहेत. 2019 मध्ये त्यांनी उणे 40 अंश तापमानात दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले होते. 2019 मध्ये त्यांनी अमेरिकेतील माउंट डेनाली सर करून 7 सर्वोच्च शिखरे सर करण्याचा विक्रम स्थापित केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.