आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तराखंड दुर्घटनेचा 9वा दिवस:तपोवनमध्ये आतापर्यंत सापडले 53 मृतदेह, अजून 150 जणांचा शोध सुरू

चमोली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बोगद्यात कॅमेरा चालवण्याचा प्रयत्न सुरू

उत्तराखंडमधील चमोलीमध्ये झालेल्या दुर्घटनेचा आज 9वा दिवस आहे. तपोवन परिसरात आतापर्यंत 53 मृतदेह सापडले असून, NTPC च्या बोगद्यातील 32 कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. जसा वेळ वाढत आहे, तशी कर्मचारी जिवंत असण्याची आशा कमी होतानाद दिसत आहे. या बोगद्यातून आतापर्यंत 5 मृतदेह आढळले आहेत. रेस्क्यूदरम्यान रविवारी रात्री अलकनंदा नदीची पाणी पातळी वाढल्याचा मेसेज व्हायरल झाला होता, पण ही अफवा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

बोगद्यात कॅमेरा चालवण्याचा प्रयत्न

चमोलीमध्ये जे 53 मृतदेह सापडले आहेत, त्यातील बहुतेक मृतदेह तपोवन परिसरात सापडले. यातही सर्वाधिक संख्या NTPC चा बोगदा आणि रैणी गावातून सापडले आहेत. सध्या बोगद्यात 32 कर्मचारी अडकले असल्याचा संशय आहे. बोगद्यातील 130 मीटरपर्यंतचा ढिगारा साफ करण्यात आला आहे. सध्या यात कॅमेरा चालवण्याचा प्रयत्न सुरू आहे. रेस्क्यू टीमला अजूनही बोगद्यात ऑक्सीजन असल्याची आशा आहे.

अजूनही 150 जण बेपत्ता

उत्तराखंड पोलिसांनी सांगितले की, दुर्घटनेत 206 जण बेपत्ता झाले होते. यातील 150 जणांचा शोध सुरू आहे. ऋषिगंगा, धौलीगंगा आणि याच्या परिसरात शोध कार्य सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...