आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उत्तराखंड दुर्घटनेचा आज 17 वा दिवस आहे. आतापर्यंत 70 लोकांचे मृतदेह आणि 29 मानवी अवयव आढळले आहेत. उत्तराखंडच्या चमोलीमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर 136 बेपत्ता होते. आता राज्य सरकारने या सर्वांना मृत घोषित केले आहे. याबाबत एक अध्यादेश राज्य सरकारकडून काढण्यात आला आहे. आता मंगळवारपर्यंत दुर्घटनेत जीव गमावणाऱ्यांची संख्या 206 झाली आहे.
राज्य सरकारनुसार, चमोली आणि जवळच्या परिसरांमध्ये शोध सुरू आहे. मोठ्या संख्येत लोकांचे मृत आढळले आहेत. तर काही लोकांना सुरक्षित काढण्यात आले आहे. तरीही ज्या लोकांची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही, त्यांना मृत घोषित करण्यात येईल.
ऋषीगंगेच्या वरील तलावाचे तोंड रुंद करण्यात आले
चमोलीमध्ये रैणी गावाजवळ ऋषिगंगा नदीच्यावर हिमकडा तुटल्याने तयार झालेल्या आर्टिफिशयल तलावाचाही मोठा धोका आहे. तलावाच्या छोट्या तोंडामुळे पाण्याचा प्रवाह कमी होता. यामुळे तलाव फुटण्याचा धोका होता. ITBP च्या जवानांनी तलावाचे तोंड सुमारे 15 फूट रुंद केले आहे. येथे पाणी साचल्यामुळे दबाव वाढत होता. राज्य आपत्ती प्रतिसाद संघाचे (SDRF) कमांडंट नवनीत भुल्लर सांगतात की, तलावाचे तोंड रुंद करण्याचे काम अजूनही सुरू आहे.
तलावामध्ये सुमारे 4.80 कोटी लीटर पाणी आहे
ऋषी गंगाच्या वर हिमकडा तुटल्यामुळे बनलेल्या आर्टिफिशयल तलावाची इंडियन नेव्ही, एअरफोर्सस आणि एक्सपर्ट टीमने पाहणी केली. डायव्हर्सने तलावाची खोली मोजण्यात आली. या तलावात जवळपास 4.80 कोटी लीटर पाणी होण्याचा अंदाज आहे.
तज्ञांच्या मते हा तलाव सुमारे 750 मीटर लांबीचा असून तो आणखी अरुंद होत आहे. त्याची खोली आठ मीटर आहे. नौदलाच्या डायव्हर्सने हातात इको साउंडर घेऊन या तलावाची खोली मोजली. जर हा तलाव तुटला तर त्यामुळे बरेच नुकसान होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते हे तलाव केदारनाथच्या चौरबाडीसारखा आहे. 2013 मध्ये, केदारनाथच्या वरच्या भागात 250 मीटर लांबीचा,150 मीटर रुंद आणि सुमारे 20 मीटर खोल सरोवर तुटल्यामुळे आपत्ती उद्भवली होती. या तलावातून दर सेकंदाला सुमारे 17 हजार लिटर पाणी बाहेर येत होते.
सेंसर देखील लावले
या तलावामध्ये होणाऱ्या सर्व हालचालींवर नजर ठेवण्यासाठी विशेषज्ञांची टीम लावण्यात आली आहे. यासोबतच ऋषिगंगा नदीमध्ये संसरही बसवण्यात आला आहे. ज्यामुळे नदीचा जलस्तर वाढण्याचा अलार्म वाजेल. SDRF ने कम्युनिकेशनसाठी येथे एक डिव्हाइसही लावले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.