आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांचा अखेर राजीनामा

डेहराडून/नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून तीरथसिंह रावत यांची यात्रा सुमारे चार महिन्यांतच संपुष्टात आली. तीन दिवस दिल्लीत तळ ठोकल्यानंतर भाजप अध्यक्ष जे. पी. नड्‌डा यांची भेट घेऊन त्यांनी शुक्रवारी रात्री डेहराडून गाठले. रात्री उशिरा राज्यपाल बेबीराणी मौर्य यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला.

राजीनामा दिल्यानंतर ते म्हणाले की, सहा महिन्यांत विधानसभा निवडणूक जिंकण्याच्या बाध्यतेमुळे मी राजीनामा दिला आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी ३ वाजता भाजपच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी पर्यवेक्षक म्हणून केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर असतील. नवीन मुख्यमंत्री सध्याच्या आमदारांपैकीच एक असू शकतो. त्यामुळे ६ महिन्यांत पोटनिवडणूक घेण्याची गरज पडणार नाही. सूत्रांच्या मते, भाजप श्रेष्ठींनी याच घटनात्मक बाध्यतेचा हवाला देऊन तीरथ यांना राजीनामा मागितला. आता मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत राज्यातील मंत्री धनसिंह रावत, बन्सीधर भगत, हरकसिंह रावत आणि सतपाल महाराज यांची नावे चर्चेत आहेत. त्रिवेंद्रसिंह रावत यांच्या जागी १० मार्च रोजी मुख्यमंत्री झालेल्या तीरथ यांना पदावर राहण्यासाठी १० सप्टेंबरपर्यंत आमदार म्हणून निवडून यावे लागणार होते. सध्या ते पौडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.

बातम्या आणखी आहेत...