आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंड:मुख्यमंत्री रावत यांच्या गच्छंतीची शक्यता, दिल्लीत अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डांची बैठक

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांची खुर्ची धोक्यात असल्याचे म्हटले जात आहे. भाजपचे आमदार त्यांच्यावर नाराज असल्याच्या वृत्तानंतर दिल्लीत सोमवारी पक्षश्रेष्ठींची बैठक झाली. त्यासाठी रावत यांनाही दिल्लीला बोलावण्यात आले. त्यानंतरच ही अटकळ सुरू झाली.

सूत्रांच्या मते, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी संसद परिसरात चर्चा केली. पुढील वर्षी राज्यातील निवडणूक पाहता पक्षश्रेष्ठी मोठा निर्णय घेऊ शकतात. आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी काहींना मंत्री केले जाऊ शकते. तरीही त्यांचे समाधान झाले नाही तर नेतृत्वात बदल होण्याचीही शक्यता आहे. पक्षाचे आमदार रावत यांच्यावर नाराज असल्याचे वृत्त आहे. त्यांची नोकरशाहीबाबत जास्त तक्रार आहे.

भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांची आमदारांनी घेतली होती भेट
राज्याच्या अनेक आमदारांनी काही महिन्यांपूर्वी दिल्लीत येऊन राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांची भेट घेतली होती. सद्य:स्थितीत निवडणूक झाली तर पक्षाच्या अडचणी वाढू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. अधिकारी कामच करत नाहीत, त्यामुळे निवडणुकीत जनतेला सामोरे कसे जाणार, असा उघड प्रश्न त्यांनी विचारला होता.

बातम्या आणखी आहेत...