आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात धरणाचा बांध तुटल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. रेणी गावाजवळील धरणाचा बांध तुटल्यामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बचाव कार्यासाठी ITBP आणि SDRFचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. हरिद्वार, ऋषिकेशसह शेजारील राज्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.
आपत्तीच्या बातम्यांनंतर या आपत्तीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज केला जाऊ शकतो की यामध्ये पूल, रस्ते आणि घरे यात वाचली नसतील. राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत म्हणाले की परिस्थितीवर कायम लक्ष ठेवले जात आहे. तसेच लोकांनी अफवा पसरवू आणि त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहनही केले आहे.
दुसरीकडे उत्तरप्रदेशातही गंगा किनारी वसलेल्या शहरांमध्ये अलर्ट जारी केला आहे. बिजनौर, कन्नोज, फतेहगड, प्रयागराज, कानपूर, मिर्झापूर, गडमुक्तेश्वर, गाझीपूर आणि वाराणसी यांसारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्ह्याधिकाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
डोंगरांमधून वेगवान प्रवाहाने पाणी आले
पर्वतावर दरड कोसळण्याची परिस्थिती
तपोवन वीज प्रकल्पाचेही नुकसान झाले
पाण्यासोबत पूल देखील वाहून गेले
अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल
आपत्तीमुळे जीवित व संपत्तीचे नुकसान झाल्याबद्दल अफवा पसरवणारे, दिशाभूल करणारे व्हिडिओ किंवा संदेश व्हायरल करु नका असे आवाहन चमोली पोलिसांनी केले आहे. पोलिस सोशल मीडियावर नजर ठेवून आहेत. अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
वीज प्रकल्प व घरेही वाहून गेली
परिस्थितीवर गृहमंत्रालयाची नजर
गृहमंत्रालय परिस्थितीवर नजर ठेवून आहे. ITBP देखील गृहमंत्रालयाच्या संपर्कात आहे. प्रादेशिक प्रतिसाद केंद्र, गौचर येथून एक मोठी टीम रवाना झाली आहे. मानवी पूल उभारण्यात तज्ज्ञ असलेले जवानांना घटनास्थळी पाठवले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.