आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिसेंबरच्या मध्यातही हिमालय शिखरे ओसाड, संकटात हिमप्रदेश:बर्फवृष्टीसाठी आतुर उत्तराखंड, थंड हवेच्या ठिकाणी पारा 5 अंश जास्त

डेहराडून3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत बर्फाचा वेढा असलेली उत्तराखंडची हिमशिखरे ओसाड आहेत. भूमध्य सागरातून उठणारे पश्चिमी विक्षोभ काश्मिरात बर्फवृष्टी करत मध्य आशियाकडे आगेकूच करत आहेत. उत्तराखंडच्या २५०० मीटर उंचीवरील थंड हवेच्या ठिकाणांवर कमाल तापमान सरासरीपेक्षा ५ अंश जास्त नोंदवले. नैनिताल, मसुरी, रानीखेत, चकराता व मुक्तेश्वरमध्ये किमान तापमानही ४ ते ५ अंशांपर्यंत जास्त आहे. या ठिकाणी डिसेंबर मध्यापर्यंत किमान तापमान ० ते ४ अंश अपेक्षित आहे.

उत्तराखंड : ४००० मीटर उंच गावात बर्फ गायब महाराष्ट्रात १९ डिसेंबरपर्यंत थंडी ओसरणार नाशिक | नाशिक, धुळे, जळगाव, नगर, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. १९ डिसेंबरपर्यंत किमान तापमान वाढीमुळे थंडी ओसरणार असल्याची माहिती हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. निफाडला ११ अंश नीचांकी तापमान नाेंद झाले.

बातम्या आणखी आहेत...