आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रचारसभेला संबोधित करताना राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी हे पंतप्रधान नसुन ते एक राजा आहे, ते देशात कुणाचेही म्हणणे ऐकत नाही. असे म्हणत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. आज राहुल गांधी यांनी ऊधम सिंह नगर जिल्ह्यातील किच्छा स्थित मंडी परिसरात जनसभा घेत जनतेला संबोधित केले. ही सभा सकाळी आकरा वाजता सुरुवात होणार होती. मात्र राहुल गांधी उशिरा पोहोचल्याने ही सभा दुपारी एक वाजता सुरू झाली.
शेतकऱ्यांनी भारत सरकारला सत्य दाखवून दिले
राहुल गांधी म्हणाले, मी शेतकऱ्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो की, केंद्र सरकारच्या तिन्ही कायद्याविरोधात शेतकरी डोंगरप्रमाणे उभे राहिले. केंद्र सरकारने खूप प्रयत्न केले मात्र ते मागे हटले नाहीत. शेतकऱ्यांनी भारत सरकारला सत्य दाखवून दिले. या सरकारला सत्यता दाखवणे खूप आवश्यक होते. पुढे राहुल म्हणाले की, शेतकरी फक्त देशाला अन्नच पुरवत नाही तर, रस्ता पण दाखवतात. इंग्रजांविरुद्ध युद्ध व्यावसायिकांनी नाही तर, शेतकरी आणि कामगारांनी लढले होते. असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर शेतकरी आंदोलनावरुन टीका केली.
पुढे राहुल गांधी म्हणाले की, मनमोहन सिंग यांचा काळ हा सुवर्णकाळ होता, कारण त्यावेळी शेतकरी आणि सरकार यांच्यात भागीदारी होती. सरकारचे दरवाजे उघडे होते. तुमच्या मनात काय आहे ते तो सांगू शकत होता. त्यावेळी भारतात एक पंतप्रधान होता, आजच्या भारतात राजा आहे. नरेंद्र मोदी हे राजा आहेत, पंतप्रधान नाहीत. असे राहुल गांधी म्हणाले.
हा राजा देशाच्या जनतेचे म्हणणे ऐकत नाही
शेतकरी आंदोलनात शेतकरी सुमारे एक वर्ष कडाक्याच्या थंडीत आणि कोरोना काळात देखील रस्त्यावर उतरले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे म्हणणे वेळेवर ऐकूण घेतले नाहीत. यूपीए सरकार असताना शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही केवळ दहा दिवसात 70 हजार कोटींची कर्जमाफी केली होती. यूपीए आणि शेतकऱ्यांचे भागिदारीचे संबंध होते. त्यामुळे प्रत्येकाला असे वाटायचे की, हे आपलेच सरकार आहे. नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसोबत जे केले ते काँग्रेस पार्टी कधीच करणार नाही. काँग्रेस पार्टी मरुन जाईल मात्र शेतकऱ्यांसोबत असे कृत्य कधीच करणार नाहीत. असे शाश्वती देखील राहुल गांधी यांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.