आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये तपोवन च्या NTPC बोगद्यामध्ये अडकलेल्या 35 लोकांना काढण्याचे काम सलग तिसऱ्या दिवशी सुरू आहे. अडीच किलोमीटर लांब या बोगद्यामध्ये पाण्यामुळे दलदलीचे स्वरुप आले आहे. यामुळे, बचावकार्यात अडचणी येत आहेत. ITBP अधिकारी अपर्णा कुमार यांनी सांगितले की, बोगद्यातून रात्रभर चिखलाचा ढिगारा काढून घेण्यात आला आहे. आतापर्यंत आम्ही बोगद्यात अडकलेल्या कोणत्याही मजुरांशी संपर्क साधू शकलो नाही.
रविवारी झालेल्या दुर्घटनेत तपोवनमधील खासगी कंपनीच्या ऋषिगंगा वीज प्रकल्प व NTPC प्रकल्प साइटला सर्वाधिक नुकसान झाले होते. 3 दिवसांच्या बचाव कार्यात प्रथमच ऋषिगंगा प्रकल्पस्थळावरून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सोमवारी बचाव पथकाने तपोवन परिसरातून 26 मृतदेह आणि 5 मानवी अवयव ताब्यात घेतले होते. बोगद्यात अडकलेल्या कामगारांसह 171 लोक येथून बेपत्ता आहेत. चमोली येथे झालेल्या अपघातानंतर 197 लोक बेपत्ता आहेत.
#WATCH Rescue work underway at Tapovan tunnel, Joshimath in Uttarakhand. ITBP team will work overnight at the site. The work to take out debris and slush from the tunnel to continue overnight pic.twitter.com/2wF7sb1DnY
— ANI (@ANI) February 8, 2021
ठिकाण | किती लोक बेपत्ता |
रैणी गाव | 5 |
तपोवन ऋत्विक कंपनी | 121 |
करछौ | 2 |
रिंगी गाव | 2 |
ऋषिगंगा कंपनी | 46 |
ओम मैटल | 21 |
HCC | 3 |
तपोवन गाव | 2 |
यामधील 29 लोकांचे मृतदेह मिळाले आहेत, तर 177 लोकांचा शोध अद्याप लागू शकलेला नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.