आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uttarakhand Government May Limit The Number Of Saints And Devotees For Kumbh Mela So That Crowd Can Be Controlled

कुंभमध्ये निर्बंधांची तयारी:आखाड्यामध्ये साधु-संत आणि श्रद्धाळुंची संख्या कमी केली जाऊ शकते; गर्दीवरील नियंत्रणासाठी सर्वांसाठी वेळ ठरवली जाणार

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलग वाढत आहे कोरोना संक्रमितांचा आकडा

कोरोना काळात हरिद्वारमध्ये सुरू असलेल्या कुंभमध्ये बुधवारी शाही स्नानाच्या वेळी 10 लाखांपेक्षा जास्त भक्तांनी गंगेमध्ये स्नान केले. आता वृत्त आहे की, सरकार कुंभविषयी कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत आहे. उत्तराखंडच्या तीरथ सरकारने बुधवारी यावर चर्चा केली.

प्रवक्ते सुबोध उनियाल यांनी सांगितले की, गर्दीमुळे कोविड-19 साठी जारी गाइडलाइनचे पालन कुंभमध्ये करुन घेण्यात सातत्याने अडचणी येत आहेत. तीर्थयात्री आणि साधु-संतांमध्येही सलग कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत. अशा वेळी कठोर पाऊले उचलली जाऊ शकतात.

उनियाल यांनी सांगितले की, 'कुंभामध्ये यात्री आणि आखाड्यांमध्ये साधु-संतांची संख्या मर्यादित केली जाऊ शकते. वेळ ठरवली जाऊ शकते, ज्यामुळे दिवसातून एका वेळी ठरवलेल्या संख्येत लोक कुंभमध्ये उपस्थित राहतील.'

सोशल डिस्टेंसिंग आणि मास्क घालण्याविषयी सख्ती
त्यांनी सांगितले की, 'काही खास नियम बनवले जाऊ शकतात. सोशल डिस्टेंसिंग आणि मास्कविषयी सख्ती केली जाऊ शकते.' उनियाल यांनी सांगितले की, कुंभसोबतच लग्नात सामिल होणाऱ्या लोकांची संख्या 50 केली जाऊ शकते. शनिवार आणि रविवारी पूर्णपणे कर्फ्यू लावला जाऊ शकतो.

कुंभ वेळेपूर्वीच संपवला जाऊ शकतो का? या प्रश्नावर ते म्हणाले की, सध्या सरकार असे काही करण्याचा विचार करत नाहीये. आम्ही महामारीच्या स्फोटापासून वाचण्यासाठी काही कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहोत. दुसरीकडे डीजीपी अशोक कुमार यांनी सध्या अशा कोणत्याही आदेशांविषयी अनभिज्ञता जाहीर केली आहे. मात्र ते म्हणाले की, कदाचित काही निर्णय घेतले जातील.

यात्रा प्रशासनानुसार 14 एप्रिलला दुसऱ्या शाही स्नानमध्ये 5 वाजेपर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त लोकांनी स्नान केले. अजुनही तेथे स्नान करणाऱ्यांची गर्दी आहे. पुढचे आणि अखेरचे स्नान आता 27 एप्रिलला होईल.

सलग वाढत आहे कोरोना संक्रमितांचा आकडा
12 एप्रिलला झालेल्या पहिल्या शाही स्नाननंतर डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले होते की, कुंभमधील गर्दी पाहता आम्ही कोरोना टेस्टिंगचा आकडा 50 हजारांपेक्षा जास्त केला आहे. 11, 12, 13 एप्रिलला सलग 53,000, 49,000 आणि जवळपास 60,000 लोकांची टेस्टिंग झाली. पहिल्या दिवशी जवळपास 800 लोक म्हणजेच 1.5 टक्के लोक संक्रमित आढळले. दुसऱ्या दिवशी हा आकडा जवळपास 900 होता तर दिसऱ्या दिवशीही 100 च्या जवळपास लोक संक्रमित आढळले.

प्रशासन आणि डीजीपी अशोक कुमार यांनी स्पष्टपणे कबूल केले होते की कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करणे आता शक्य नाही. अशोक कुमार म्हणाले होते की आम्ही 9-10 एप्रिल पर्यंत कठोरपणे मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पण त्यानंतर जमावाला शिस्त लावण्यात अडचणी आल्या.

बातम्या आणखी आहेत...