आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभ दरम्यान बनावट कोरोना टेस्टिंग:ED ने दिल्ली ते डेहराडूनपर्यंत लॅबवर छापा टाकला; बनावट बिल, लॅपटॉप आणि 30.9 लाख रुपयांची रोकड जप्त

डेहराडून2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडमधील कुंभमेळा दरम्यान बनावट कोरोना चाचणीचे प्रकरण समोर आले आहे. EDने शुक्रवारी या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भात पाच डायग्नोस्टिक फर्मच्या उच्च अधिकाऱ्यांच्या घरे आणि कार्यालयांची झडती घेतली. या दरम्यान बनावट बिले, लॅपटॉप, मोबाईल फोन, मालमत्तेची कागदपत्रे आणि 30.9 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले.

तपस यंत्रणेने नोव्हस पथ लॅब, डीएनए लॅब, मॅक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस, डॉ.लाल चांदणी लॅब्स आणि नलवा लॅबोरेटरीजवर छापा मारला. डेहराडून, हरिद्वार, दिल्ली, नोएडा आणि हिसार येथे छापे मारण्यात आले. राज्य सरकारने त्यांना आधीच 3 कोटी 40 लाख रुपये दिले आहेत.

लॅब्सने टेस्टिंगची जेवढी संख्या दाखवली, तेवढ्या टेस्ट झाल्या नाहीत
या प्रकरणी उत्तराखंड पोलिसांनी तक्रार दाखल केली होती, त्यानंतर ईडीने तपास सुरू केला. या प्रयोगशाळांना उत्तराखंड सरकारने कुंभमेळ्यादरम्यान रॅपिड अँटीजन टेस्ट आणि आरटी-पीसीआर टेस्ट घेण्याचे कंत्राट दिले होते. लॅब्सने टेस्टिंगची जेवढी संख्या दाखवली, तेवढ्या टेस्ट झाल्या नसल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यादीतील अनेक नावे बनावट होती.

जे कुंभमध्ये गेले नाहीत त्यांची टेस्ट केलेल्या यादीतही नावे आहेत
ईडीने सांगितले की, त्यांनी अनेक लोकांसाठी समान मोबाइल नंबर, पत्ता आणि फॉर्म वापरला. चाचणी न करता अनेक लोकांची नावे त्यात जोडली गेली. यापैकी बरेच लोक होते जे कुंभला गेले नव्हते. या प्रयोगशाळांच्या बनावट निगेटिव्ह चाचण्यांमुळे, त्यावेळी हरिद्वारमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 0.18% राहिला, जो प्रत्यक्षात 5.3% होता.

असा उघडकीस आला घोटाळा
हा घोटाळा जूनमध्ये उघडकीस आला होता. पंजाबमधील एका व्यक्तीच्या मोबाईलवर कुंभमध्ये कोरोना टेस्ट करण्याचा मॅसेज आला, परंतु ती व्यक्ती हरिद्वारला गेलीच नव्हती. त्यांनी याबाबत तक्रार दाखल केली. या प्रकरणात ICMR च्या सक्रियतेवर राज्य सरकारने तपास सुरू केला. सुरुवातीला 1 लाखांहून अधिक बनावट कोरोना टेस्ट केल्याची माहिती समोर आली.

बातम्या आणखी आहेत...