आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uttarakhand High Court Gives Permission For Chardham Yatra, 3 Thousand Devotees Are Allowed Daily

ग्राउंड रिपोर्ट:चारधामसाठी रोज 3 हजार भाविकांना परवानगी, पण कुंडात स्नानास मनाई; उत्तराखंड हायकोर्टाचा चारधाम यात्रेसाठी हिरवा कंदील

डेहराडून / मनमीतएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंड उच्च न्यायालयाने चारधाम यात्रा सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या या आदेशाने उत्तराखंड सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे हजारो व्यावसायिक, तीर्थावरील पुरोहितांसह उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग जिल्ह्यातील रहिवासींचे उदरनिर्वाह पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार उत्तराखंडमधील चारधामचे मार्ग पूर्णपणे खुले करण्यात आले आहेत. ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. आता उत्तराखंड सरकार दोन दिवसांत मार्गदर्शक तत्त्वांसह यात्रा सुरू करण्याचे आदेश जारी केले जाऊ शकतात. वास्तविक उत्तराखंड सरकारने जूनमध्ये चारधाम यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवरील सुनावणी करताना २८ जून रोजी यात्रेला स्थगिती दिली होती. परंतु गुरुवारी हायकोर्टाने सरकारद्वारे दाखल शपथपत्रावरील सुनावणीत स्थगित हटवणारा निर्णय दिला. चारधाम यात्रेकरूंना ७२ तासांत कोरोना निगेटिव्ह अहवाल सोबत ठेवावे लागेल. लसीचे दोन डोस घेतलेल्या यात्रेकरूंनाच याबाबत परवानगी मिळणार आहे.

केदारनाथमध्ये एका दिवसात ८०० लोकांना दर्शनाची परवानगी असेल. बद्रीनाथमध्ये १२००, गंगोत्रीमध्ये ६०० व यमुनोत्रीमध्ये ४०० यात्रेकरूंची संख्या निश्चित करण्यात आली आहे. परंतु भाविकांना कुंडात स्नान करण्यास पूर्णपणे मनाई असेल. लोक निर्माण विभागातील एचआेडी हरिआेम म्हणाले, मान्सूनमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते बंद झाले होते. मात्र आता सर्व मार्ग पूर्णपणे खुले झाले आहेत. हे मार्ग सुरक्षित आहेत. रस्ते बंद झाल्यास यंत्रसामग्रीसह पथके तैनात करण्यात आले आहेत. उत्तराखंडमध्ये १० हजारांहून जास्त हॉटेल व्यावसायिक, होम स्टे संचालकांना न्यायालयांच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष संदीप सैनी म्हणाले, बहुतांश व्यावसायिक कर्जात बुडाले होते. त्यांना यात्रा सुरू झाल्यामुळे दिलासा मिळाला. होम स्टे व्यवस्था असलेल्यांची संख्या पाच हजारांवर आहे. त्यांनी कर्ज घेऊन ही व्यवस्था उभारली होती. त्यांनाही दिलासा मिळाला.६५ लाख धार्मिक यात्रेकरूंचा यात समावेश असतो. २०१९ मध्ये चारधाम यात्रेदरम्यान सुमारे २ हजार कोटींची उलाढाल झाली होती.

चारधाम यात्रा सुरू झाल्याने समाधानाबरोबर निराशाही
न्यायालयाच्या निर्णयानंतर चारधाम येथील व्यवसायाशी संबंधित लोकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. परंतु कडक नियम लागू केल्याने तीर्थावरील पुरोहितांमध्ये नाराजी दिसून आली. बद्रीनाथचे आमदार महेंद्र भट म्हणाले, या निर्णयामुळे यात्रेशी संबंधित लोकांना दिलासा मिळाला आहे. परंतु अनेक पुरोहितांच्या दृष्टीने हा निर्णय जास्त दिलासा देणारा नाही. तीर्थ पुरोहित तुंगनाथ कोटियाल म्हणाले, कोर्टाने यात्रेकरूंना ब्रह्मस्नान व पूजाआरतीस बंदी घातली आहे. मग भाविक असेच यात्रेवर कसे येतील? सरकारने सर्व प्रकारचे नियम बाजूला सारून यात्रे सुरू करायला हवी.

यात्रेसाठी दीड महिन्याचा कालावधी शिल्लक, पुरेशा कमाईबाबत शंका
चारधाम यात्रा सुरू करण्याचा निर्णय हायकोर्टाने घेतला आहे. प्रत्यक्षात यात्रा केवळ दीड महिने चालणार आहे. कारण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व कपाट बंद होतात. त्यामुळेच दीड महिन्यात व्यावसायिक किती कमाई करतील हा प्रश्नच आहे. कारण उत्तराखंडमध्ये आधी कोविड व नंतर मान्सूनने पर्यटन व्यवसायाची कंबर मोडली आहे. चार हजारांहून जास्त होम स्टे संचालक, हॉटेल व्यवसायाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. उत्तराखंड हॉटेल संघाचे अध्यक्ष संदीप सैनी म्हणाले, दरवर्षी या स्थितीत साडेतीन कोटी लोक उत्तराखंडला भेट देतात.

बातम्या आणखी आहेत...