आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चमोलीच्या तपोवनमध्ये NTPC च्या बोगद्यात अडकलेल्या 39 कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न आजही(बुधवार) सुरुच आहेत. अडीच किलोमीटर लांब या बोगद्यात पुरात वाहून आलेला ढिगारा अडकल्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. आतापर्यंत 120 मीटर बोगद्याची सफाई झाली असून, आर्मी, ITBP, NDRF आणि SDRF ची पथकांकडून बचाव कार्य सुरुच आहे.
काही मीडिया रिपोर्टमध्ये अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले जात आहे की, 4 दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांसमोर हायपोथर्मिया (शरीराचे तापमान कमी होणे) आणि ऑक्सीजन लेव्हल कमी होण्याची भीती आहे.
आतापर्यंत 32 मृतदेह सापडले
उत्तराखंडच्या दुर्घटनेंतर मंगळवारपर्यंत 6 अजून 6 मृतदेह साडले असून, आतापर्यंत 32 जणांचे मृतदेह सापडले आहेत. सरकारने सांगितल्यानुसार, या दुर्घटनेत 200 पेक्षा जास्त लोक बेपत्ता झाले आहेत. यातील 170 पेक्षा जास्त लोकांचा अद्याप शोध लागला नाही.
ठिकाण | कीती लोक बेपत्ता |
ऋृत्विक कंपनी | 21 |
ऋत्विक कंपनी साथीदार | 94 |
HCC कंपनी | 3 |
ओम मेटल | 21 |
तपोवन गाव | 2 |
रिंगी गाव | 2 |
ऋषि गंगा कंपनी | 55 |
करछो गाव | 2 |
रैणी गाव | 6 |
एकूण | 206 |
अमित शाह म्हणाले- उत्तराखंडच्या सखल भागात पूराचा धोका नाही
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी बुधवारी राज्यसभेत उत्तराखंड दुर्घटनेवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, रविवारी समुद्र सपाटीपासून 5600 मीटरच्या उंचीवर 14 चौरस किलोमीटर परिसरात हिमकडा कोसळला. यामुळे धौलीगंगा आणि ऋषिगंगा नदीत पूरस्थिती निर्माण झाली. तसेच, उत्तराखंडच्या सखल भागात पूराचा धोका नसल्याचेही त्यांनी यावळी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.