आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uttarakhand New Chief Minister Pushkar Singh Dhami Row Over Map Of Akhand Bharat; News And Live Updates

शपथ घेण्यापूर्वी वादात धामी:उत्तराखंडच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या 6 वर्ष जून्या ट्व‍िटवर उपस्थ‍ित होत आहे प्रश्न, देशाच्या नकाशात लडाख आण‍ि पाकिस्तान व्याप्त क्षेत्रे नाही

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्तराखंडला म‍िळणार सर्वात कमी वयाचा मुख्यमंत्री

उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी काही वेळातच आपल्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. परंतु, यापूर्वी ते वादात आले असून त्यांच्या 6 वर्ष जून्या ट्व‍िटवर प्रश्न उपस्थ‍ित केले जात आहे. त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लडाख आण‍ि पाकिस्तानात व्यात क्षेत्रे नव्हते. पुष्कर सिंह धामी यांच्या शपथव‍िधीपूर्वीच हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यामुळे एकीकडे धामी यांच्या शपथव‍िधीला काही वेळ उरलेला असताना धामी वादात सापडले आहे.

उत्तराखंडला म‍िळणार सर्वात कमी वयाचा मुख्यमंत्री
पुष्कर सिंह धामी हे उत्तराखंड राज्याचे सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री होणार आहे. दोन वेळा आमदार राहिलेले धामी हे कधीही उत्तराखंड सरकारमध्ये मंत्री नव्हते. परंतु, आता ते थेट मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे. त्यांचा जन्म 16 सप्टेंबर 1975 रोजी पिथौरागडच्या टुंडी गावात झाला होता. त्यांनी मानव संसाधन व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंधात मास्टर्स केले आहेत. 1990 ते 1999 पर्यंत त्यांनी ABVP मध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...