आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातीरथ सिंह रावत यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल बेबी राणी मौर्य यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आहे. यावेळी बोलताना, एवढी मोठी जबाबदारी मिळेल याची कल्पना सुद्धा केली नव्हती. पक्षाने दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडणार असे तीरथ सिंह रावत म्हणाले आहेत.
उत्तराखंडच्या आमदार गटाच्या बैठकीनंतर बुधवारीच मुख्यमंत्री पदावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले तीरथ सिंह रावत यांची निवड करण्यात आली. भाजपमध्ये अंतर्गत विरोधातून सीएम त्रिवेंद्र सिंह रावत यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपच्या आमदारांची बैठक पार पडली. याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्रिवेंद्र सिंह रावत यांनीच केली नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली.
कोण आहेत तीरथ सिंह रावत
पौडी गढवाल येथे जन्मलेले तीरथ सिंह रावत सध्या पौडी लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. उत्तर प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुद्धा होते. 1997 मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशातून आमदारकी मिळवली होती. उत्तराखंडमध्ये ते शिक्षण मंत्री सुद्धा होते. तीरथ सिंह रावत भाजपचे उत्तराखंड प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. त्यांनी 9 फेब्रुवारी 2013 ते 31 डिसेंबर 2015 पर्यंत प्रदेशाध्यक्ष पद भूषविले. तत्पूर्वी चौबटखल विधानसभा मतदार संघातून ते 2012 ते 2017 पर्यंत आमदार होते. सध्या ते भाजपचे राष्ट्रीय सचिव आहेत.
यामुळे बदलावा लागला मुख्यमंत्री
भाजपने आपले राष्ट्रीय उपाध्यक्ष रमन सिंह तसेच सरचिटणीस आणि राज्याचे प्रभारी दुष्यंत गौतम यांच्या आमदार गटाच्या बैठकीचे पर्यवेक्षक केले आहे. दोन्ही नेत्यांना आजच डेहराडूनला बोलावण्यात आले आहे. तत्पूर्वी शनिवारी भाजपने या दोघांना निरीक्षक बनवून उत्तराखंडमध्ये पाठवले होते. दोघांनी एक रिपोर्ट तयार करून भाजप मुख्यलयात पाठवली होती. तसेच राज्यातील मंत्री आणि आमदार सरकारचा चेहरा बदलण्याची मागणी करत आहेत असे सांगितले होते. मुख्यमंत्री नाही बदलल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला नुकसान होईल असेही या अहवालात सांगण्यात आले होते.
भाजपला काहीच फायदा होणार नाही -काँग्रेस
त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर उत्तराखंडमध्ये भाजपला काहीच फायदा होणार नाही असे काँग्रेसने म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरीश रावत यांनी सांगितले, की राजीनामा घेऊन भाजपच्या नेतृत्वाने मान्य केले की सध्याच्या सरकारकडून कोणतेच काम होऊ शकलेले नाही. राज्यात सत्ता परिवर्तन मला स्पष्ट दिसून येत आहे. आता ते (भाजप) कुणाला मुख्यमंत्री पदावर बसवतील याला काहीच अर्थ नाही. आगामी निवडणुकीत त्यांची सत्ता येणार नाही असा दावा हरीश रावत यांनी मंगळवारी बोलताना केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.