आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Uttarakhand NTPC Tapovan Tunnel Rescue Operation 14 Feb LIVE Update | Uttarakhand Chamoli Glacier Burst Latest Today News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चमोलीमध्ये बचावकार्याचा 8वा दिवस:तपोवनच्या बोगद्यात आज 2 मृतदेह सापडले, रेस्क्यू टीम म्हणाली- अडकलेल्या लोकांना वाचवण्याची आशा अजून कायम

चमोली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिमकडा तुटून तयार झालेल्या तलावामुळे तुर्तास कोणताच धोका नाही

उत्तराखंडमधील चमोलीच्या तपोवनमध्ये सुरू असलेल्या बचावकार्याचा आठवा दिवस आहे. आज येथील NTPC च्या बोगद्यातून अजून दोन मृतदेह सापडले आहेत. या परिसरात सापडलेल्या मृतदेहांची संख्या 40 वर पोहचली आहे. दोन मृतदेह सापडल्यानंतर बचावकार्याचा वेग वाढवला आहे. यावेळी रेस्क्यू टीमने म्हटले की, आम्हाला बोगद्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्याची आशा अजून कायम आहे. या बोगद्यात अजून 37 कर्मचारी अडकले असल्याचा संशय आहे.

NDRF चे कमांडर पीके तिवारी यांच्या हवाल्याने काही रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे की, बोगद्यात अजून काहीजण जिवंत आहेत. आम्ही अजून निराश झालो नाहीत. आम्हाला वाटतयं की, बोगद्यात अजूनही ऑक्सीजन उपलब्ध आहे. आमचे 100 पेक्षा जास्त शास्त्रज्ञ नव-नवीन मार्ग शोधण्याच्या कामात आहेत.

अडचणीत दिलासा

या सर्व अडचणींमध्ये एक दिलासा देणारी बातमीदेखील आहे. हिमकडा तुटून तयार झालेल्या तलावामुळे तुर्तास कोणताच धोका नाही. SDRF चे कमांडेंट नवनीत भुल्लर यांनी 14 हजार फूट ऊंचीवर ऋषिगंगामध्ये तयार झालेल्या या तलावाचा आढावा घेतला. हा तलाव दुर्घटनेनंतर तयार झाला आहे. एरियल व्ह्यू आणि सॅटेलाइट इमेजच्या आधारे संशय व्यक्त करण्यात येत होता की, हा तलाव फुटल्यास परत एकदा महापूर येऊ शकतो. नवनीत यांनी या तलावाचा एक व्हिडिओ जारी केला आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, तलावातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे तलाव फुटण्याची शक्यता नाही.

बातम्या आणखी आहेत...