आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चमोली दुर्घटनेच्या बचावकार्याचा आज 13 वा दिवस आहे. आतापर्यंत 62 लोकांचे मृतदेह आणि 28 मानवी अंग मातीच्या ढिगाऱ्यातून काढले आहेत. 142 लोक अजुनही बेपत्ता आहेत. हे दुर्घटना एवढी भयानक होती की, आतापर्यंत चमोलीच्या अनेक भागांमध्ये मातीचे ढिगारे आहेत. हा ढिगाराही आता डोंगरांऐवढा झाला आहे. हे खोदून NDRF, SDRF आणि उत्तराखंड पोलिस बचावकार्य करत आहेत.
डॉग स्क्वॉडची टीम घटनास्थळी
मातीच्या ढिगाऱ्यामध्ये दबलेल्या लोकांना शोधण्यासाठी NDRF आणि SDRF ची टीम डॉग स्क्वॉड, दूरबीन, राफ्ट आणि इतर उपकरणांचा वापर करत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपोवन टनलमध्ये अजुनही मोठ्या प्रमाणात लोक अडकले असल्याची शक्यता आहे. चिखल आणि दलदल असल्यामुळे बचावकार्य करताना अडचणी येत आहेत. लोकांचे मृतदेह खराब होऊ नयेत यामुळे बचावकार्य काळजीपूर्वक केले जात आहेत.
नद्यांच्या जलस्तरावर सलग निगरानी
दरम्यान SDRF ने रैणी गावाच्या जवळ ऋषिगंगा नदीमध्ये वॉटर सेंटर लावले आहे. नदीमध्ये जलस्तर वाढण्यापूर्वीच अलार्म वाजेल. हा अलार्म एक किलोमीटर अंतरापर्यंतच्या लोकांना ऐकायला येईल आणि योग्य वेळी लोक सुरक्षितस्थळी पोहोचतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.