आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uttarakhand NTPC Tapovan Tunnel Rescue Operation LIVE Update | Uttarakhand Chamoli Glacier Burst Latest News

उत्तराखंड दुर्घटना:तपोवनमधील बचाव कार्यात बदल, बोगद्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी ड्रिलिंगचा पर्याय

डेहरादून2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत 32 मृतदेह सापडले

उत्तराखंडमधील चमोलीच्या तपोवनमध्ये झालेल्या दुर्घटनेचा आज पाचवा दिवस आहे. दरम्यान, NTPC च्या बोगद्यात अडकलेल्या 39 कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. परंतू, आता या बचाव कार्याची पद्धत बदलण्यात आली असून, आता बोगद्यात 72 मीटरवर ड्रिलिंग सुरू करण्यात आली आहे. ही ड्रिलिंग 13 मीटर खोल केली जाईल आणि आत कॅमेरा टाकून कर्मचारी सुरक्षित असल्याची खात्री केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ड्रिलिंग मध्यरात्री 2 वाजता सुरू झाली. आतापर्यंत साडेसहा मीटर खोल खोदकाम झाले असून एक अडचम समोर आली आहे. पहिले 75 मिलीमीटरचे होल करायचे होते, पण त्यात अडचण येत असल्यामुळे आता 50 मीटरचे होल केले जाणार आहे.

आधी ढिगारा हटवून आत जाण्याची योजना होती

या बोगद्याची लांगी अडीच किलोमीटर आहे. यातील बहुतेक भागात पुरात वाहुन आलेला ढिगारा अडकला आहे. आर्मी, ITBP, NDRF आणि SDRF च्या टीम बुधवारपर्यंत बोगद्यात थेट जाण्याचा प्रयत्न करत होते. 120 मीटरपर्यंतचा ढिगारा साफ करण्यात आला होता. परंतु, यात अडचण येत असल्यामुळे ड्रिलिंगचा पर्याय निवडला.

आतापर्यंत 32 मृतदेह सापडले

उत्तराखंड दुर्घटनच्या तिसऱ्या दिवशी, म्हणजेच मंगळवारी अजून 6 मृतदेह सापडले होते. आतापर्यंत 32 जणांचे मृतदेह सापडले आहेत. सरकारने सांगितले की, दुर्घटनेनंतर 206 जण बेपत्ता आहेत. यातील 174 जणांचा अद्याप शोध लागला नाही.