आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Uttarakhand NTPC Tapovan Tunnel Rescue Operation LIVE Update | Uttarakhand Chamoli Glacier Burst Latest Today News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चमोलीमध्ये बचावकार्याचा 8 वा दिवस:तपोवनमध्ये आज 12 मृतदेह सापडले, यामध्ये 5 टनलमध्ये निघाले; रेस्क्यू टीमला बोगद्यामध्ये अडकलेले लोक जिवंत असल्याची अपेक्षा

चमोली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सकाळी मिळालेल्या दोन्ही मृतदेहांची ओळख पटली

चमोलीच्या तपोवनमध्ये बचावकार्याचा रविवारी आठवा दिवस आहे. आज NTPC च्या टनलमधून 5 अजून मृतदेह काढण्यात आले. रैणी गावातूनही 6 मृतदेह मिळाले आहेत. तर एक मृतदेह रुद्रप्रयागमध्ये आढळला. आतापर्यंत सापडलेल्या मृतदेहांची संख्या 50 झाली आहे. संध्याकाळी बोगद्यामध्ये अजून एक बॉडी असल्याची माहिती मिळाली, ते काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. सकाळी दोन मृतदेह सापडल्यानंतर टनलमध्ये रेस्क्यू ऑपरेशन गतीने केले जात होते. बचाव पथकाने म्हटले की, आम्हाला अजुनही टनलमध्ये अडकलेले लोकांना वाचवण्याची अपेक्षा आहे. या टनलमध्ये 32 कर्मचारी अजूनही फसलेले असल्याची शक्यता आहे.

यामुळे आशा कायम
NDRF चे कमांडर पीके तिवारींच्या हवाल्याने काही रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे की, टनलमध्ये काही लोक अजूनही जिवंत आहेत. तिवारी यांनी सांगितले की, आम्ही आमच्या अनुभवाच्या आधारे अजुनही निराश झालेलो नाही. आम्हाला वाटतेय की, टनलमध्ये अजुनही ऑक्सीजन उपलब्ध आहे आणि लोक जिवंत राहू शकतील असे गॅप आम्हाला आढळले आहेत. आमचे 100 पेक्षा जास्त वैज्ञानिक सतत रस्ता शोधत आहेत. टीम टनलमध्ये 130 मीटरपर्यंत पोहोचली आहे. या टनलला शुक्रवारी होल करण्यात आला. हे 75 मिमी रुंद आहे. आता याला 300 मिमी रुंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेणेकरुन कॅमेरा आणि पाणी बाहेर फेकणारा पाइप यामध्ये इन्स्टॉल केला जाऊ शकेल.

सकाळी सापडलेल्या दोन्ही मृतदेहांची ओळख पटली
जिल्हा प्रशासनानुसार, सकाळी आढळलेले दोन्ही मृतदेह हे उत्तराखंडचे रहिवासी होते. मृतदेहांची ओळख अनिल सिंह आणि आलाम सिंह असी झाली आहे. आलाम सीनियर इलेक्ट्रॉशियन होता, तर अनिल वेल्डर होता. इतर लोक बोगद्यापासून थोडे दूर असू शकतात. शोधकार्य अजुनही सुरू आहे.