आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uttarakhand Political Crisis Latest News Update। Trivinder Singh Rawat Resigns As Chief Minister Of Uttarakhand

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा:मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी राज्यपालांकडे सोपविला राजीनामा; म्हणाले- कारण दिल्लीला जाऊन विचारा

डेहराडूनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पक्षाचे कौतुक करतानाच राजीनाम्याचे दुःख लपवू शकले नाही रावत

उत्तराखंडमध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेले राजकीय नाट्य आज मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या राजीनाम्याने संपुष्टात आले. त्यांनी राज्यपाल बेबी रानी मौर्य यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. राज्यातील शिक्षण मंत्री धन सिंह रावत यांना मुख्यमंत्री केले जाऊ शकते. त्यांनी सरकारी हेलिकॉप्टरने डेहराडूनला बोलावण्यात आले आहे. आता बुधवारी 10 वाजता आमदार गटाची बैठक होणार आहे.

कौतुक करताना दुःख लपवू शकले नाही रावत
पत्रकार परिषदेत बोलताना रावत म्हणाले, की "गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहे. भाजपने मला राजकीय आयुष्यातील सुवर्ण संधी दिली होती. छोट्याशा गावात एका सैनिकाच्या घरात माझे जन्म झाले होते. कधीच कल्पना केली नव्हती की मला इतका मोठा सन्मान दिला जाईल." भाजपचे तोंडभर कौतुक करत असताना राजीनामा दिल्याचे दुःख त्यांना लपवता आले नाही. पत्रकार परिषदेत त्यांना राजीनामा देण्याचे कारण विचारण्यात आले, तेव्हा, "कारण शोधण्यासाठी तुम्हाला दिल्लीला जावे लागेल" असे रावत म्हणाले.

भावी मुख्यमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा
पुढे बोलताना रावत म्हणाले, की "4 वर्षे सेवा देण्याची मला संधी दिली. पक्षाने विचार केला आणि सामूहिकरित्या निर्णय घेण्यात आला की आता इतर कुणाला तरी संधी द्यायला हवी. 4 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यासाठी अजुनही 9 दिवस बाकी आहेत. राज्यातील नागरिकांचे आभार मानतो. जो कुणी ही जबाबदारी घेईल त्यांना माझ्याकडून शुभेच्छा."

त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरीश रावत यांनी भाजपला चिमटा घेतला. भाजपच्या नेतृत्वाने मान्य केले की सध्याच्या सरकारकडून कोणतेच काम होऊ शकलेले नाही. राज्यात सत्ता परिवर्तन मला स्पष्ट दिसून येत आहे. आता ते (भाजप) कुणाला मुख्यमंत्री पदावर बसवतील याला काहीच अर्थ नाही. आगामी निवडणुकीत त्यांची सत्ता येणार नाही असा दावा हरीश रावत यांनी केला आहे.

पक्षांतर्गत विरोधाचे बळी ठरले त्रिवेंद्र सिंह रावत
भाजपने आपले राष्ट्रीय उपाध्यक्ष रमन सिंह तसेच सरचिटणीस आणि राज्याचे प्रभारी दुष्यंत गौतम यांच्या आमदार गटाच्या बैठकीचे पर्यवेक्षक केले आहे. दोन्ही नेत्यांना आजच डेहराडूनला बोलावण्यात आले आहे. तत्पूर्वी शनिवारी भाजपने या दोघांना निरीक्षक बनवून उत्तराखंडमध्ये पाठवले होते. दोघांनी एक रिपोर्ट तयार करून भाजप मुख्यलयात पाठवली होती. तसेच राज्यातील मंत्री आणि आमदार सरकारचा चेहरा बदलण्याची मागणी करत आहेत असे सांगितले होते. मुख्यमंत्री नाही बदलल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला नुकसान होईल असेही या अहवालात सांगण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...