आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uttarakhand Political Crisis LIVE; Tirath Singh Rawat Resign | BJP MLAs' Meet Today In Dehradun, Uttarakhand Latest News, Pushkar Singh Dhami Will Be The New Chief Minister

उत्तराखंडचे नवीन CM:पुष्कर सिंह धामी असतील राज्याचे नवीन मुख्यमंत्री, आजच घेऊ शकतात पदाची शपथ

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुष्करसिंग धामी हे उधमसिंह नगर जिल्ह्यातील खटीमा सीटचे आमदार आहेत.

उत्तराखंडच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुष्करसिंग धामी यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री केले गेले आहे. तीरथसिंग रावत यांनी शुक्रवारी राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत धामी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. तो मंजूर करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पुष्करसिंग धामी आज राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात.

पुष्करसिंग धामी हे उधमसिंह नगर जिल्ह्यातील खटीमा सीटचे आमदार आहेत. तीरथसिंग रावत यांच्या राजीनाम्यानंतर भाजपने आज देहरादूनमध्ये पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती. केंद्राच्या वतीने कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना बैठकीसाठी निरीक्षक केले गेले. त्यांच्या उपस्थितीत धामी यांचे नाव जाहीर करण्यात आले.

पुष्करसिंह धामी यांचा जन्म 16 सप्टेंबर 1975 रोजी पिथौरागडच्या टुंडी गावात झाला होता. त्यांनी मानव संसाधन व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंधात मास्टर्स केले आहेत. 1990 ते 1999 पर्यंत त्यांनी ABVP मध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे.

तीरथ वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिले
मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांचा 114 दिवसाचा कार्यकाळ त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अधिक ओळखला जाईल. फाटलेल्या जीन्सपासून ते 20-20 मुलांपर्यंत कोणीही त्यांचे विधान विसरलेले नसेल. पदभार स्वीकारताच तीरथ भावनांच्या भरात काहीही बोलत राहिले.

कुंभमेळ्या दरम्यान, संतांना संतुष्ट करण्यासाठी कोरोनाचे नियम शिथिल करण्याचा त्यांनी अधिकाऱ्यांना इशारा केला, त्यामुळे हिंदूचा हा कुंभ कोरोनाचा हॉटस्पॉट बनला. इतकेच नव्हे तर कोर्टाच्या डोळ्यात धूळ फेक करण्यासाठी भाजपच्या निकटवर्तीयांनी ज्या पद्धतीने बनावट सँपलिंग आणि टेस्टिंग केले त्यामुळे तीरथ सरकारची प्रतिमा मलिन झाली.

बातम्या आणखी आहेत...