आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uttarakhand; Shiva Parvati Wedding Venue Triyuginarayan Temple Turned Wedding Destination; Couples Come From Home And Abroad, Employment Also Increased| Marathi News

दिव्य मराठी विशेष:उत्तराखंड ; शिव-पार्वती विवाहस्थळ त्रियुगीनारायण मंदिर बनले वेडिंग डेस्टिनेशन; देश-विदेशातून येतात जोडपी, रोजगारही वाढला

मनमीत | डेहराडून14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिमालयाच्या पायथ्याशी दाेन हजार मीटर उंचीवर ज्या मंदिरात भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला असे मानले जाते, ताे परिसर आता विवाहस्थळ म्हणून उदयास येत आहे. येथे दरवर्षी २०० हून अधिक विवाह आयोजित हाेतात. हे मंदिर उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे. तीन युगांपासून येथील अग्निकुंड अखंड प्रज्वलित असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या मंदिराचे नाव त्रियुगीनारायण पडले. असे मानले जाते की या मंदिरात अग्नी प्रदक्षिणा केल्याने पती-पत्नी जन्मजन्मांतरीचे सहचर होतात. विवाहांचे आयोजन करणारे पंकज गायरोला सांगतात की, पूर्वी फक्त आजूबाजूच्या गावांतील लोकच विवाह करत. पण येथील व्हिडिओ पाहिल्यानंतर २०१५ पासून देश-विदेशातील विवाहेच्छुकांची संख्या वाढली.

आता स्थिती अशी आहे की इथे विवाहासाठी रांगा लागल्या असून तारीख मिळणे अवघड झाले आहे. बुधवारीच गुजरात, महाराष्ट्र आणि डेहराडून येथील कुटुंबीय लग्नासाठी आले होते. एका दिवसात फक्त तीन विवाह लावण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे मंदिराचे पुजारी आणि ग्रामस्थ इच्छुकांना नंतर लग्न करण्याचा सल्ला देत आहेत. त्रियुगीनारायण जनविकास मंदिर समितीचे अध्यक्ष दिवाकर गेराेला सांगतात, पूर्वी विवाह नियोजक बाहेरून येत. स्वयंपाकी ते पुजारी सोबत असत, पण आता गावातील मंगल दलाच्या महिला मंगलगीते गातात. तरुणांना स्वयंपाक आणि बँडवादनचे प्रशिक्षण दिलेे.

आता तेथे २० पेक्षा जास्त विवाह नियाेजक आहेत. मंदिराच्या आसपास राहणाऱ्या २ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. त्रियुगीनारायण मंदिरात टीव्ही अभिनेत्री निकिता शर्मा, कविता कौशिक यांच्यासह दक्षिण आफ्रिकेतील गुप्ता कुटुंबातील कन्येचा विवाह झाला. हेलिपॅडची सुविधा असल्यामुळेे मंदिरानजीक विवाहस्थळी पोहोचणे सोपे होते.

शिव-पार्वती विवाहात विष्णू हाेते माता पार्वतीचे बंधू, ब्रह्मदेव पुजारी
येथे शिव-पार्वती विवाहात, विष्णूंनी माता पार्वतीचा भाऊ म्हणून सर्व विधींमध्ये सहभागी झाले, तर ब्रह्मदेव या विवाहासाठी पुजारी हाेते. विवाह स्थळासाठी निश्चित केलेल्या जागेला ब्रह्मशिला म्हणतात, जी मंदिरासमोर आहे. या मंदिराच्या महात्म्याचे वर्णन पुराणातही आढळते. लग्नापूर्वी सर्व देवतांनीही येथे स्नान केले होते त्यामुळे येथे तीन कुंड बनविण्यात आली. ती रुद्रकुंड, विष्णुकुंड आणि ब्रह्मकुंड नावाने आेळखली जातात. या तिन्ही तलावांतील पाणी सरस्वती कुंडातून येते.

बातम्या आणखी आहेत...