आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तराखंडमध्ये रविवारी हिमकडा तुटल्यामुळे मोठे नुकसान झाले. त्यावेळी तपोवन परिसरातील भूमिगत बोगद्यात सुमारे 12 लोक उपस्थित होते. अचानक आलेल्या पुरामुळे बोगद्यात पाणी आणि ढिगारा जमा झाला. त्यांना बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. प्रत्येकाने आशा सोडली होती. तेवढ्यात तिथे अडकलेल्या एका व्यक्तीच्या मोबाईलमध्ये नेटवर्क दिसले. त्याने अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि त्यानंतर इंडो-तिबेट सीमा पोलिसांनी (ITBP) सर्वांना बाहेर काढले.
बचावानंतर रुग्णालयात दाखल केलेल्या प्रकल्पावरील एका कामगाराने सांगितले की, 'मी चमोलीतील धाक गावातील रहिवासी आहे आणि तपोवन प्रकल्पात काम करतो. बोगद्यात अडकल्यानंतर आम्ही आशा सोडली होती. मग आम्हाला थोडा प्रकाश दिसला आणि श्वास घेण्यासाठी थोडीशी हवा मिळाली. यानंतर फोन कॉलने आमचे जीवन वाचले.'
आम्हाला काही समजण्यापूर्वीच बोगदा ढिगाऱ्याने भरला
बोगद्यातून वाचविण्यात आलेल्या नेपाळमधील रहिवासी बसंतने ते सांगितले की, ढिगारा बोगद्यात आला, तेव्हा आम्ही 300 मीटर आतमध्ये अडकलो होतो. तपोवन वीजप्रकल्पाचे कामगार लाल बहादुर यांच्या हवाल्याने वृत्तसंस्थेने सांगितले की, आम्ही एक माणूस ओरडत असल्याचे पाहिले. आम्ही करायच्या आत प्रचंड प्रमाणात पाणी आणि ढिगारा आमच्याकडे आला. जोशीमठचे रहिवासी विनोद सिंह पवार यांनी सांगितले की, ते रॉडच्या आधाराने बोगद्यामध्ये अर्ध्या रस्त्यापर्यंत आले होते, मात्र पाणी आल्यामुळे तेथेच अडकले.
कामगारांनी बोगद्यात 7 तास दिली मृत्युशी झुंज
ITBP बहादुर यांच्यासह 11 लोकांना बोगद्यातून बाहेर काढले. सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर रविवारी सायंकाळी या लोकांना बोगद्याच्या अरुंद भागातून बाहेर काढता आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की हे लोक सुमारे 7 तास (सकाळी 10 ते सायंकाळी 5) बोगद्यात अडकले होते. या सर्वांना अपघाताच्या ठिकाणाहून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या जोशीमठ येथील ITBP रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.