आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uttarakhand's CM Dhami's Record Victory; In 93% Of The Votes, The Seat Of Kerala Was Won By The Congress, While Bijd Won In Odisha

धामींचा विक्रमी विजय:उत्तराखंडचे सीएम धामींचा विक्रमी विजय; 93% मते, केरळची जागा काँग्रेसला, ओडिशात बिजद जिंकले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तीन राज्यांच्या तीन विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. उत्तराखंड व ओडिशाची जागा सत्तारूढ भाजप आणि बिजदने एकतर्फी जिंकली. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत खटिमातून पराभूत झाल्यानंतरही मुख्यमंत्री झालेले पुष्करसिंह धामी चंपावतमधून विक्रमी मतांनी जिंकले. धामी यांनी काँग्रेसच्या निर्मला गहतोडी यांना ५४,१२१ मतांनी पराभूत केले. धामी यांना ५८,२५८ म्हणजे ९३% मते मिळाली आहेत. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीतील हा विजय सर्वात मोठ्या फरकाने झाला आहे.

दुसरीकडे, ओडिशाच्या ब्रजराजनगर जागेवर बिजद उमेदवार अलका मोहंती यांनी काँग्रेसचे किशोर पटेल यांचा ६६,१२२ मतांनी पराभव केला. केरळच्या थ्रिक्काकारा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमा थॉमस यांनी सत्तारूढ एलडीएफचे जो. जोसेफ यांचा २५,०१६ मतांनी पराभव केला.

बातम्या आणखी आहेत...