आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तरकाशी:6133 मीटर उंचीवरील श्रीकांत शिखरावरून आशेचे चित्र : बर्फात अडकलेले गिर्यारोहक बचावासाठी उभारतात बर्फाचीच भिंत

उत्तरकाशीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हे छायाचित्र उत्तरकाशीचे आहे. ६१३३ मीटर उंचीवरील श्रीकांत शिखर सर करण्यासाठी जाणारे गिर्यारोहक अशा प्रकारे आणीबाणीच्या स्थितीत स्वत:ला बर्फ आणि थंडीपासून वाचवतात. हे छायाचित्र श्रीकांत शिखराचा बेस कॅम्प असलेल्या सात तालजवळून भास्करसाठी प्रसिद्ध गिर्यारोहक आणि छायाचित्रकार तिलक सोनी यांनी काढले आहे.

तिलक सांगतात, पर्वत तुमच्या शक्तीची परीक्षा घेतात. चढाई करताना थकणे स्वाभाविक आहे. अशात बर्फात थांबून स्वत: टिकून राहणे हीदेखील एक कला आहे. गिर्यारोहक बर्फापासून बचाव करण्यासाठी बर्फाचाच आधार घेतात. बर्फच त्यांची आशा असते. ते अगोदर खड्डा खोदून झोपण्याएवढी जागा करतात, मग चहुबाजूंनी बर्फाची छोटी भिंत उभी करतात. बर्फाच्या या भिंती झोंबणाऱ्या वाऱ्यापासून बचाव करतात. याला स्नो शेल्टर्स म्हटले जाते. गिर्यारोहकांना प्रशिक्षणादरम्यान बर्फात बचाव करण्याचे असे तंत्र शिकवले जाते.