आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्राप्तिकर विभागाला अत्तर व्यापारी पुष्पराज जैन ऊर्फ पम्पी तसेच याकूब मलिकच्या कन्नोज, कानपूर, दिल्ली, लखनऊ आणि मुंबईतील घर आणि कार्यालयातून विशेष यश मिळाल्याचे संकेत नाहीत. मात्र, अत्तर यूपी निवडणुकीत निवडणुकीचा मुद्दा झाला आहे. सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार, पम्पी जैनच्या कंपनीत आखाती देशांतून सुमारे ४० कोटींच्या गुंतवणुकीची माहिती मिळाली आहे. गुंतवणूक कशा पद्धतीने आणली याची चौकशी प्राप्तिकर विभाग करत आहे. यासोबत पुष्पराज ऊर्फ पम्पी जैनकडील साठ्यातील रजिस्टरमधून सत्यापन केले जात आहे.
राजकीय शेरेबाजी सुरू
या कारवाईला उत्तर प्रदेशच्या निवडणुकीआधी ‘छापा राजकारणाशी’ जोडले जात आहे. पुष्पराज जैन सपाचे विधान परिषद सदस्य आहेत. दोघा व्यापाऱ्यांच्या छाप्याच्या कारवाईसाठी लखनऊच्या पोलिसांना बोलावण्यात आले आहे. अत्तर व्यापाऱ्यांच्या छाप्यावरून सपा आणि भाजप समोरासमोर उभे आहेत. पीयूष जैनच्या छाप्यात मोठ्या प्रमाणात जप्त केलेल्या रकमेनंतर राज्याचे राजकारण तापले आहे. पुष्पराजने अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत अत्तर लाँच केले होते.
नातेवाइकांचे घर सील, रोकड देवाण-घेवाणीचे पुरावे
कन्नौजमध्ये याकूब मलिकच्या घराजवळ बँकेची नोट मोजण्याची मशीन मागवली होती. ती ४ तासांत परत पाठवली. मलिकच्या दिल्लीस्थित घरातून प्राप्तिकर विभागाला रोकड देवाण-घेवाणीचे पुरावे मिळाले आहेत. यासोबत कन्नौज आणि दिल्लीत चार लॉकरही मिळाले. ते सध्या सील केले आहेत. सूत्रांनुसार, कानपूरमध्ये पुष्पराजचे नातेवाईक डॉ. अनुप जैनच्या आनंदपुरी येथील दोन्ही घरांना सील केले आहे. प्राप्तिकर विभागाने मात्र अधिकृत निवेदन केले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.