आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तराखंड ग्राउंड रिपोर्ट:बंधारे, कालवे, रस्त्यांमुळे नद्यांचे प्रवाह झाले अरुंद, नियमांना बगल

डेहराडून7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खाेरे, नद्यांमध्ये ढिगारे, माती रिचवल्याने नदी पात्राच्या रुंदीत झाली घट

उत्तराखंडच्या डाेंगराळ भागातील अनियाेजित विकास नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहाला अरुंद करणारा ठरला आहे. भुयारी बंधारे, डाेंगर खाेदून तयार केलेले रस्त्यांच्या याेजना देवभूमीत सर्वत्र दिसून येतात. जेसीबी यंत्रांचे आवाज चाोहीबाजूने एेकू येतात. बांधकाम कंपन्या नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहात ढिगारे, माती रिचवत आहेत. ढिगाऱ्याचे तर माेजमाप करणे कठीण आहे.

उत्तराखंडमध्ये रस्त्यांची कामे वेगाने केली जात आहेत. त्यात आॅल वेदर राेडचाही समावेश आहे. यमुनाेत्री, गंगाेत्री, केदारनाथ व बद्रीनाथ यादरम्यान सुमारे ९०० किमीचे रस्ते आहेत. चारधाम यात्रेला सुलभ करण्यासाठी असलेल्या या रस्ते याेजनांबाबत अनेक वादही निर्माण झाले आहेत. त्याची पायाभरणी २०१६ मध्ये झाली हाेती. ऋषिकेशपासून कर्णप्रयागपर्यंत रेल्वेमार्गदेखील या प्रकल्पाचा भाग आहे. आतापर्यंत सुमारे ४०० किमीहून जास्त रस्त्यांच्या चाैपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सप्टेंबर २०२० मध्ये सर्वाेच्च न्यायालयाने कत्तल केलेल्या झाडांच्या भरपाईसाठी राज्य सरकारला वृक्षाराेपणाचे आदेश दिले हाेते. सरकारने काेर्टात त्याबाबत एक शपथपत्र सादर केले हाेते. २५ हजार झाडांची कत्तल झाली. परंतु उत्तराखंड आंदाेलन व सामाजिक कार्यकर्ते याेगेश भट्ट म्हणाले, सुमारे दाेन-अडीच लाख झाडे ताेडण्यात आली. सरकारने धार्मिक, सामरिक महत्त्व असल्याचे सांगून डाेंगराळ भागात अनावश्यक रुंदीचे रस्ते तयार केले. ते गरजेचे नव्हते. रस्ते परिवहन मंत्रालयाने रस्त्यांची रुंदी ५.५ ते ७ मीटर निश्चित केली हाेती. त्यास काेर्टाने परवानगी दिली हाेती. परंतु असे असूनही प्रत्यक्षात रस्ते १० ते १५ मीटर रुंदीचे करण्यात आले. अजूनही असेच काम सुरू आहे.

आपत्तीशी संबंध नाही
केंद्र सरकारने बुधवारी सुप्रीम काेर्टात चारधाम रस्ते चाैपदरीकरणाबाबतची भूमिका मांडली. या याेजनांचा आणि उत्तराखंडमधील नुकत्याच झालेल्या आपत्तीशी काहीही संबंध नाही. संरक्षण मंत्रालयाच्या वतीने अॅटर्नी जनरल के.के. वेणुगाेपाल यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, काेर्टाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या आराेपांवर उत्तर देण्यासाठी आम्हाला अवधी दिला जावा. आपत्ती व चाैपदरीकरणाचा परस्पर संबंध असल्याचा आराेप समितीने केला.

मातीचा उपसा, ढिगारे पावसाळ्यात स्फाेटकासारखे
उत्तराखंडच्या स्टेट हाॅर्टिकल्चर अँड फाॅरेस्ट युनिव्हर्सिटीचे पर्यावरण विज्ञानचे प्राेफेसर डाॅ. एस.पी. सती म्हणाले, डाेंगरातील २० ते ६० हजार क्युबिक मीटर ढिगारा प्रति एक किमी रस्त्याच्या चाैपदरीकरणासाठी खाेदला जाताे. ते ठिकाणानुसार कमी-अधिक हाेऊ शकते. मात्र त्यावरून २० हजार किमी रस्त्यांसाठी झालेल्या खाेदकामामुळे किती माेठ्या प्रमाणात मातीचा उपसा झाला असेल याचा अंदाज लावता येऊ शकताे. हा उपसा नद्यांमध्ये दाबण्यात आला. पावसाळ्यात ताे स्फाेटकासारखा काम करताे. त्याची मारकक्षमताही त्यामुळे वाढते. केदारनाथ व चमाेलीतील आपत्तीच्या घटनांत वीज प्रकल्पांचे सुनियाेजन असते तर प्राणहानी झाली नसती.

नियमांना बगल
पर्यावरण व सामाजिक परिणामांचा अभ्यास करण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष रवी चाेप्रा यांनी आॅक्टाेबर २०२० मध्ये महामार्ग मंत्रालयावर पुन्हा नियमांकडे कानाडाेळा केल्याचा आराेप केला आहे. समितीचे सदस्य हेमंत ध्यानी म्हणाले, भूसंपादन प्रक्रियेत जारी निर्देशात रस्ते व महामार्ग मंत्रालयाने १० मीटर रुंद रस्त्यांचा उल्लेख केला. परंतु त्याला सिंगल लेनमध्ये लागू केले जात आहे. तूर्त हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आॅल वेदर प्रकल्पात सरकारने चलाखीने नियमांना बगल दिली. वास्तविक पर्यावरणावर प्रभाव टाकू शकणाऱ्या १०० किमीच्या रस्त्यांसाठी नियम अत्यंत कडक आहेत. मात्र या प्रकल्पात त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सरकारने ९०० किमीच्या रस्त्यांचे १०० किमींहून जास्त अशा लहान-लहान याेजनांत विभाजित केले आहे. वरिष्ठ पत्रकार चारू तिवारी म्हणाले, त्यामागे नियम लागू हाेऊ नयेत, असा सरकारचा उद्देश दिसताे. काेर्टाची स्थगिती आली तरी ती एखाद्या प्रकल्पासाठी असावी.

तुकड्यातुकड्यांत याेजना
यमुनाेत्रीसाठी धरासूपर्यंत ९४ किमी, ऋषिकशेपासून १४४ किमी अंतराचा मार्ग आहे. यमुनाेत्री रारा ९४ धरासूपासून ९५ किमीपर्यंत असेल. गंगाेत्रीसाठी रारा १०८ धरासूहून १२४ किमीपर्यंत असेल. केदारनाथसाठी रुद्रप्रयागपर्यंत ऋषिकेशपासून १४० किमी अंतराचा रस्ता तयार केला जात आहे. गाैरीकुंडसाठी रुद्रप्रयागहून ७६ किमीचा रस्ता आहे. बद्रीनाथसाठी रुद्रप्रयाग ऋषिकेशपासून १४० किमी अंतर आणि माणा रुद्रप्रयागहून १४० किमीपर्यंत असेल.