आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ग्राउंड रिपोर्ट:चीन युद्धानंतर गरिबीत सफरचंदाच्या शेतीने चित्रच बदलले, एका कुटुंबाचे उत्पन्न 25 लाखांपर्यंत...

उत्तर काशी / मनमित3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनशी व्यापार बंद झाल्यानंतरच्या काळात ठरले राज्यातील श्रीमंत गाव

चीन सीमेवर भागीरथी नदीकाठी उत्तराखंडातील हर्षिल गाव वसले आहे. येथील लोकांनी १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर प्रचंड गरिबी सोसली. येथील तरुणांनी मात्र जिद्दीने दुर्गम डोंगरावर सफरचंदाच्या बागा फुलवल्या आणि परिसराचे भाग्य उजळले. आज ८ गावांतील प्रत्येक कुटुंब सफरचंदाच्या व्यापारात आहे. १० हजार हेक्टरमध्ये सफरचंदाच्या बागा आहेत. त्यावर २०५०० मेट्रिक टन उत्पादन होते.

यातील दीड लाख पेट्या सफरचंदाच्या सर्वात चांगल्या जाती गोल्डन आणि रेड डिलिसियसच्या असतात. अमेरिकेसह विविध बाजारांत त्या १० कोटी रुपयांपर्यंत विकल्या जातात. या गावातील सफरचंदाचा छोटा शेतकरीही वार्षिक कमीत कमी पाच लाख रुपये कमावतो. अनेक जण असेही आहेत, जे देश-विदेशात २५ लाखांपर्यंतचे सफरचंद विकतात. दराली गावातील शेतकरी सचेंद्र पंवार सांगतात, शेकडो वर्षांपासून आमचे पूर्वज मेंढीपालन आणि उबदार कपडे विकून उपजीविका भागवायचे. १९६२ च्या युद्धाच्या पूर्वीपर्यंत तिबेटच्या ताकलाकोट येथे बाजार भरायचा. स्वत: माझे वडील केशरसिंह नेलांग खोऱ्यातून व्यापारासाठी तिबेटला जात. तिबेटी व्यापारी सोने, चांदी, उबदार कपडे आणि गायी घेऊन हर्षिल, बगोरी, नागणीपर्यंत यायचे. येथून मंडुआ, पीठ, सत्तू, रामा सिराई पुरोलाचा लाल तांदूळ, गूळ, डाळी, लोकरी कपडे इत्यादी साहित्य घेऊन जायचे. भारत-चीन युद्धानंतर हा व्यापार बंद झाला. त्यानंतर पूर्ण भागात गरिबी पसरली. शेतकरी माधवेंद्र सांगतात, १९७८ मध्ये या भागात प्रचंड पूर आला. त्या वेळी काहीच जण स्वत:ला खाण्यापुरते सफरचंद लावायचे. मात्र, पुरानंतर आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या लोकांनी पाहिले की, गावातील रामसिंह यांचे सफरचंद भारतीय लष्कराने दहा हजारांत विकत घेतले. त्या काळी ही मोठी रक्कम होती. यानंतर लोकांनी सफरचंदाच्या बागा लावणे सुरू केले.

आज हा राज्यातील सर्वात संपन्न परिसर आहे. मुले उत्तर काशीतील शाळेत शिकताहेत. मुखवा गावातील सोमेश सेमवाल सांगतात, त्यांनी त्यांच्या घरी सफरचंदाचे चिप्स बनवणारे यंत्र लावले आहे. ते सांगतात, ३०% सफरचंद तर पर्यटकच गावातून विकत घेतात. विणकामही होते. माणूस असो की महिला... सर्वजण सूत काढताना दिसतात.

ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्याने सुरू केली होती शेती
या भागात स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश लष्करी अधिकारी फ्रेड्रिक इ. विल्सन यांनी सफरचंदाची शेती सुरू केली होती. त्यांना उत्तराखंडात पहाडी विल्सन नावानेही ओळखले जाते. १९२५ मध्ये त्यांनी गोल्डन डिलिसियस आणि रेड डिलिसियस जातीच्या सफरचंदाच्या बागा लावल्या होत्या. हर्षिल आणि परिसरातील लोकांनी १९६० मध्ये ही शेती सुरू केली. रॉबर्ट हचिन्सन यांचे पुस्तक ‘द राजा आॅफ हर्षिल’मध्येही विल्सन यांचे वर्णन आहे.