आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंड:45 वर्षीय पुष्करसिंह धामी बनले उत्तराखंड राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री , सतपाल महाराज आणि हरकसिंह रावत यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली

देहरादूनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुष्करसिंह धामी यांनी रविवारी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल बेबी राणी मौर्य यांनी त्यांना शपथ दिली. शनिवारी झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत धामी यांच्या नावावर सहमती झाली. शपथ घेण्यापूर्वी धामी स्टेजवरुन खाली उतरले आणि सतपाल महाराजांना भेटायला गेले.

मुखमंत्र्यानंतर सतपाल महाराज, हरकसिंह रावत, बंशीधर भगत, यशपाल आर्य, सुबोध उनियाल आणि बिशन सिंह यांना मंत्रिपदाची दिली गेली. या कार्यक्रमापूर्वी असे म्हटले जात होते की आज फक्त मुख्यमंत्र्यांना शपथ दिली जाईल.

कधीही मंत्री नव्हते आता थेट मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सांभाळणार धामी
पिथौरगडमध्ये जन्मलेले 45 वर्षांचे पुष्करसिंह धामी हे राज्यातील सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. दोन वेळा आमदार असलेले धामी उत्तराखंड सरकारमध्ये कधी मंत्री नव्हते, परंतु आता ते थेट मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारतील. शनिवारी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्यसेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आपण पक्षाचे आभारी आहोत. बहुमत असूनही, नेतृत्त्वाच्या अस्थिरतेबरोबर सतत झगडत असलेल्या भाजपने मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला होता.

शुक्रवारी तीरथसिंह रावत यांनी राजीनामा दिल्यानंतर शनिवारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. नरेंद्र सिंह तोमर आणि डी पुरंदेश्वरी यात केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित होते. बैठकीत तीरथसिंग रावत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांनी खटीमाचे आमदार पुष्करसिंह धामी यांचे नाव प्रस्तावित केले. यावर, केंद्रीय पर्यवेक्षकाच्या सहमतीनंतरअन्य कोणाच्या नावाचा प्रस्ताव आला नाही.

बातम्या आणखी आहेत...