आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडच्या तपोवनातील प्रलय:विध्वंस होणार हे 2009 पासूनच माहीत होते, दुर्लक्ष केल्याने दुर्घटना

नवी दिल्ली / धर्मेंद्रसिंह भदौरिया6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र चमोलीतील तपोवन बोगद्याचे आहे. येथे ३५ जण अडकल्याची भीती आहे. आयटीबीपीने आतापर्यंत २७ जणांना वाचवले आहे. २६ मृतदेह आढळले, १७१ बेपत्ता आहेत. - Divya Marathi
छायाचित्र चमोलीतील तपोवन बोगद्याचे आहे. येथे ३५ जण अडकल्याची भीती आहे. आयटीबीपीने आतापर्यंत २७ जणांना वाचवले आहे. २६ मृतदेह आढळले, १७१ बेपत्ता आहेत.
  • 11 वर्षांपूर्वी खोदकामामुळे डाेंगरांचे नुकसान झाले होते

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील रविवारची दुर्घटना टाळता आली असती. तपोवन वीज प्रकल्पाला २०१६ मध्ये गंगा शुद्धीकरण मंत्रालयाने सुप्रीम कोर्टात आक्षेप घेतला होता. मंत्रालयाने शपथपत्र दाखल करून उत्तराखंडात नवे धरण व वीज प्रकल्प धोकादायक असल्याचे म्हटले होते. पर्यावरण मंत्रालयाने त्याला विरोध केला व शपथपत्र देऊ, असे सांगितले. पण शपथपत्र दाखल झाले नाही. त्यामुळे धरणांचे बांधकाम सुरू राहिले. २००९ मध्ये बोगद्यासाठी बोअरिंगदरम्यान अलकनंदा नदीतीरी जमिनीत पाणी मुरवणारे डाेंगरकडे तुटले हाेते. पर्यावरणतज्ज्ञांनी हा इशारा असल्याचे मानले, पण मंत्रालयाने दुर्लक्ष केले. अखेर रविवारी दोन वीज प्रकल्प वाहून गेले. १७१ लोक बेपत्ता आहेत. २६ मृतदेह मिळाले आहेत.

दुर्घटनेची २ कारणे असू शकतात हे आतापर्यंतच्या चौकशीत स्पष्ट
पहिले

वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजीचे डॉ. संतोषकुमार राय यांनी सांगितले, ‘५-६ फेब्रुवारीला बर्फवृष्टी झाली, पण ७ फेब्रुवारीच्या उपग्रह प्रतिमेत बर्फ गायब आहे. म्हणजे, हे हिमस्खलनच होते.’

दुसरे
उत्तराखंड अंतरिक्ष उपयोग केंद्राचे संचालक प्रा. एम. पी. एस. बिष्ट म्हणाले,‘हिमकड्याच्या तळाशी भूस्खलन झाल्याने नदीचे पाणी थांबून तलाव निर्माण झाला. दाब वाढल्याने तलाव फुटून पूर आला.’

ग्रामस्थ पानही तोडू शकत नाहीत, मात्र विद्युत प्रकल्पांची उभारणी
नंदादेवी बायोस्फियर आहे. पान तोडण्याचाही ग्रामस्थांना हक्क नाही, मात्र विद्युत प्रकल्प उभे राहत आहेत.’ - डॉ. अनिल जोशी, पर्यावरणवादी

धरण बांधू नका असे गंगा शुद्धीकरण मंत्रालयाने सुप्रीम कोर्टात म्हटले होते; पर्यावरण मंत्रालयाने मान्य केले नाही, बांधकाम सुरूच

शपथपत्रातील मुख्य मुद्दे
- ६९ जलविद्युत प्रकल्पांमुळे भागीरथी नदीचे ८१% व अलकनंदा नदीचे ६५% नुकसान झाले आहे.
- १९८० नंतर विद्युत प्रकल्प, रस्त्यांसाठी ८.०८ लाख हेक्टर वनभूमीचे नुकसान झाले. उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, चमोली व पिथौरागड - जिल्ह्यात जास्त नुकसान. २०१३ च्या आपत्तीतही ते जास्त प्रभावित झाले होते.
- गंगेचा वरचा भाग भूस्खलन होणारा आहे. बोगद्यांसाठीच्या स्फोटांमुळे तो जास्त ठिसूळ झाला.
- प्रकल्पांसाठी होणारी वृक्षतोड केव्हाही विनाश घेऊन येईल.

बातम्या आणखी आहेत...