आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंड:पावसाने धारचुलात तीन घरे कोसळली; चाैघे ठार, परिसरात मदत व बचाव कार्य सुरू

नवी दिल्ली/पिथौरागड/लखनऊ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
आसाम : मुसळधार पावसामुळे मोरीगाव येथील घरे पाण्यात बुडाली होती. - Divya Marathi
आसाम : मुसळधार पावसामुळे मोरीगाव येथील घरे पाण्यात बुडाली होती.

डोंगराळ राज्ये व उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरू आहे. उत्तराखंडात मुसळधार पावसामुळे धारचुलाजवळ जुम्मा गावात तीन घरे कोसळली. यात दबल्याने तीन मुलांसह चार जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी रात्री उशिरा घडली. परिसरात मदत व बचाव कार्य सुरू आहे. जखमींवर उपचारासाठी घटनास्थळीच डॉक्टरांचे पथक पाठवण्यात आले होते.

दरम्यान, उत्तर प्रदेश राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत सोमवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात राज्यातील पूर्व आणि पश्चिम भागाचा समावेश आहे. या मुसळधार पावसामुळे खिरी, गोंडा, मैनपुरी, लखनऊ, कानपूर ग्रामीण, फरुखाबाद, फिरोजाबाद, सहारनपूर, कन्नौज, बहराईच, अलाहाबाद, गाझीपूर, बलरामपूर, श्रावस्तीसारखे अनेक भाग पुराच्या तावडीत सापडले आहेत.

आसाम : पुरामुळे २.२५ लाखांपेक्षा जास्त लोक प्रभावित
आसामात पूरस्थिती सतत गंभीर होत आहे. पुरामुळे १५ जिल्ह्यांत दोन लाख २५ हजारांपेक्षा जास्त लोक प्रभावित झाले आहेत. आतापर्यंत ५१२ गावे पूरग्रस्त आहेत. सुमारे २७ रस्ते व दोन पुलांचे नुकसान झाले आहे. १६३३८ हेक्टरवरील पिके पाण्यात बुडाली. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानुसार बोंगईगाव, बक्सा, बारपेटा, विश्वनाथ, चिरांग, धेमाजी, दिब्रुगड, गोलाघाट, माजुली, मोरीगाव, सोनितपूर, शिवसागर, जाेरहाट, लखीमपूर, तिनसुकिया येथे पूरस्थिती चिंताजनक आहे.

बातम्या आणखी आहेत...