आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vaccinated 18.93 Crore People In The Country So Far; Out Of These, 10.26 Crore Are Males And 8.67 Crore Are Females

लसीकरणात महिला मागे का?:देशात आतापर्यंत 18.93 कोटी लोकांना लस; यातील 10.26 कोटी पुरुष तर 8.67 कोटी महिला

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक्स्पर्ट व्ह्यू- महिलांच्या कमी सहभागामागे पुरुषी मानसिकतेचे कारण

कोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरणात महिला पिछाडीवर आहेत. देशात १०.२६ कोटी पुरुष, तर ८.६७ कोटी महिलांना लस दिली गेली आहे. म्हणजे १०० पुरुषांमागे ८८ महिला. आश्चर्य म्हणजे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या प्रगत चंदीगड, दिल्ली, पंजाब राज्यांत लस घेतलेल्या महिलांची संख्या सर्वात कमी आहे. दुसरीकडे, दुर्गम भाग असलेल्या हिमाचल, उत्तराखंड आणि छत्तीसगड यांसारख्या राज्यांत महिला पुरुषांच्या पुढे आहेत. लसीकरण मोहिमेच्या पहिल्या १५ दिवसांत १७ राज्यांत लसी घेतलेल्या महिलांची संख्या पुरुषांपेक्षा खूप अधिक होती. आता अशी केवळ ६ राज्ये आहेत.

एक्स्पर्ट व्ह्यू- महिलांच्या कमी सहभागामागे पुरुषी मानसिकतेचे कारण
‘महिलांमध्ये कमी लसीकरणात पुरुषी मानसिकतेचे एक कारण आहे. यूपी-बिहारमध्ये पुरुष नुसता दात दुखू लागला तर रुग्णालयात जातो, परंतु महिलांना गंभीर आजार असला तरी टाळले जाते. म्हणून सरकारने पोलिओ निर्मूलन अभियानासारखी घरोघर जाऊन लसीकरण मोहीम राबवावी. अनेक देशांत हे धोरण आहे. घरात कुणी आजारी असेल तर त्यांची सेवा महिलाच करतात हे आपण लक्षात घ्यायला हवे.’ -प्रो. आनंद कुमार, सामाजिक कार्यकर्ते

बातम्या आणखी आहेत...