आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vaccination And Corona Cases, Asia Pacific; India Corona Outbreak Updates; News And Live Updates

डेल्टा प्लस व्हेरिएंट:कोरोनाची दुसरी लाट ओसरताच भारताला त‍िसर्‍या लाटेचा धोका; देशात डेल्टा प्लसचे 50 पेक्षा जास्त रुग्ण

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आश‍ियातील सर्वात जास्त रुग्ण भारतात

देशात कोरोना महामारीची दुसरी लाट हळूहळू कमी होताना द‍िसत आहे. परंतु, आश‍िया खंडात असे काही देश आहेत जेथे अजूनही कोरोनाचे नवीन प्रकरणे द‍िवसेंद‍िवस वाढतच आहे. व‍िशेष म्हणजे आश‍िया खंडातील सर्वात जास्त नवीन रुग्ण भारतात आढळले आहे. त्यामुळे देशात एकीकडे कोरोनाची दुसरी लाट कमी होत आहे. तर दुसरीकडे डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे कोरोनाच्या त‍िसर्‍या लाटेचा धोका न‍िर्माण होत आहे. यामुळे देशातील वातावरण चिंताजनक बनत चाललं आहे. केंद्र सरकारने संबंधित राज्यांना कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी कडक पाऊले उचलण्यास सांग‍ितले आहे.

आश‍ियातील सर्वात जास्त रुग्ण भारतात
भारतात कोरोना महामारीची दुसरी लाट भलेही कमी होत असली तरी आश‍िया खंडातील कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण भारतात आहे. त्यासोबतच संपूर्ण आश‍ियात लसीकरणाचा वेग मंदावलेला आहे. त्यामुळे एकीकडे डेल्टा प्लस व्हेरिएंटची चिंता आण‍ि दुसरीकडे लसीकरणाची कमतरता यामुळे आश‍ियातील काही देशात धोक्याची घंटा वाजत आहे.

डब्ल्यूएचओने डेल्टा प्रकाराबद्दल द‍िली चेतावणी
जागत‍िक आरोग्य संघटनेने नुकतेच कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या प्रकाराबद्दल चेतावणी द‍िली आहे. हा व्हेरिएंट इतर व्हेरिएंटपेक्षा जास्तच धोकादायक आण‍ि संसर्गजन्य असल्याचे सांग‍ितले आहे. त्यामुळे सगळ्याच देशांनी याला रोखण्यासाठी तयारी करण्यास सांग‍ितले होते. कारण आधीच कोरोनाच्या पह‍िल्या आण‍ि दुसर्‍या लाटेमुळे अनेक देशाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

जगात दुसर्‍या क्रमांकावर भारत
देशात आतापर्यंत कोरोनाचे 3.05 कोटी रुग्ण आढळले असून यात 4 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 4 लाख 80 हजार लोकांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, र‍िकव्हरी रेट 96.97% असून आतापर्यंत 2.96 कोटी उपचार घेत बरे झाले आहे.

देशात 35 कोटी लोकांचे लसीकरण
गेल्या काही द‍िवसांपासून देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 35 कोटी लोकांना कोरोनाचे डोस देण्यात आले आहे. त्यासोबतच डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्णही मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. देशात या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण 11 जून रोजी आढळला असून सध्या देशात याचे 50 पेक्षा जास्त रुग्ण आहे.

बातम्या आणखी आहेत...