आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vaccination Certificate । WhatsApp । Union Health Ministry Informed । CoWIN । COVID 19; News And Live Updates

लसीकरण प्रमाणपत्र:व्हॉट्सअॅपवर मागवता येईल लसीकरण प्रमाणपत्र, फक्त एका मोबाईल क्रमांकावर पाठवावा लागेल मॅसेज

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोग्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर दिली माहिती

देश-विदेशातील प्रवाशांना अनेक देशात प्रवेश देण्यापूर्वी लसीकरण प्रमाणपत्र मागितले जात आहे. विशेष म्हणजे भारतातील अनेक राज्यांनीही याला सहमती दर्शवली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने लस प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडविया यांनी शनिवारी सांगितले की, कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र आता काही सेकंदात आपल्याला व्हॉट्सअॅपद्वारे मिळू शकेल. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कोविन पोर्टल किंवा अॅपवरून लस प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणींचा सामना करणाऱ्या लोकांना यामुळे खूप मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक देश आता लस प्रमाणपत्रला प्रवेश घेण्यापूर्वी अनिवार्य केले आहे.

आरोग्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर दिली माहिती
आरोग्य मंत्रालयाच्या मते, ज्या व्यक्तीला लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळवायचे आहे, त्याने त्याच्या मोबाईलवरून व्हॉट्सअॅप क्रमांकावर एक मॅसेज पाठवायचा आहे. यानंतर काही सेकंदात आपल्या व्हॉट्सअॅपवर हे प्रमाणपत्र पाठवले जाईल. आरोग्यमंत्री मनसुख मंडविया यांनी या हा निर्णय सर्वसामान्यासाठी उत्तम असल्याचे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

नोंदणीकृत क्रमांकावर येईल ओटीपी
प्रमाणपत्र मिळवण्यासाठी +91 9013151515 हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा लागेल. यानंतर, covid certificate लिहून या क्रमांकावर संदेश पाठवावा लागेल. ज्या क्रमांकावरून लसीकरणासाठी नोंदणी केली जाईल त्यावर OTP येईल. त्याला व्हॉट्सअॅपच्या मेसेज बॉक्समध्ये लिहून परत पाठवायचे आहे. यानंतर, काही सेकंदात आपल्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर लसीचे प्रमाणपत्र प्राप्त होईल.

बातम्या आणखी आहेत...