आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील ७.४० कोटी किशोरवयीन मुले व मुली सोमवारपासून कोरोनाशी लढण्यासाठी लस घेऊ शकतील. त्यांच्यासाठी शाळांत लसीकरण केंद्रं स्थापन करण्यात आली. लसीकरण केंद्रांवरही वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेल्या युवकांनी नोंदणी केलेली नसली तरी जागेवरच नोंदणी करून लस घेऊ शकतील. यासाठी शाळेचे ओळखपत्र मान्य असेल. त्यांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस दिला जाईल. दुसरा डोस २८ दिवसांनंतर घ्यावा लागेल. कोविन पार्टलवर रविवारपर्यंत ७.२१ लाख युवकांनी नोंदणी केली होती.
बूस्टर : देशात पुढील सोमवारपासून दक्षता डोसही, जगातील ८४ देशांत सुरुवात झाली
देशात १० जानेवारी म्हणजे येत्या सोमवारपासून ६० वर्षांहून अधिक वयाच्या गंभीर आजार असलेल्या वृद्धांना दक्षता (तिसरा) डोस दिला जाईल. अशा लोकांची संख्या सुमारे पावणेतीन कोटी आहे. फ्रंटलाइन आणि हेल्थ केअर वर्कर्सनाही याच दिवसापासून दक्षता डोस दिला जाईल. त्यांची संख्या सुमारे ४ कोटी आहे. ब्लूमबर्ग ट्रॅकरच्या मते जगातील ८४ लहान मोठ्या देशांनी बूस्टर डोस देणे सुरू केले. यातील १२ देश असे आहेत ज्यांनी लोकसंख्येच्या प्रमाणात ४० % हून अधिक बूस्टर डोस दिले आहेत. दरम्यान, यूएईने दोन डोस घेतलेल्या लोकांना बूस्टर डोस देणे सुरू केले. जगात सरासरी प्रत्येक १०० पैकी ७ लोकांना बूस्टर डोस मिळाला आहे.
चाचणीत सहभागी मुलांच्या कुटुंबीयांना लस वाटते पूर्णपणे सुरक्षित
लसीच्या शेवटच्या टप्प्याच्या चाचणीत जयपूरमध्ये १०० किशोरवयीन सहभागी होते. कोणातही साइड इफेक्ट दिसले नाहीत. नीरज (१५) व नमन (१७) यांची आई पुष्पा म्हणाल्या की, दोन्ही मुलांना लस दिली गेली. आता कोरोनाची भीती नाही. शशांक (१४) व दक्षिता (१२) यांचे वडील जितेंद्र गुप्ता म्हणाले, दोन्ही मुले आनंदाने तयार झाली होती. १३ वर्षांच्या शुभम साहूचे वडील शंकरलाल बताते म्हणाले, ती यासाठी त्वरित तयार झाली होती. आतापर्यंत सर्व ठीक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.