आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिमाचल प्रदेशातील मलाणा व शाक्टी-मरोड ही अत्यंत दुर्गम गावे. तेथील गावकऱ्यांना कोरोनाची लस देण्याचे काम एखाद्या आव्हानासारखे होते. परंतु आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जिद्दीमुळे हे शक्य होऊ शकले. कुलूचे मलाणा व शाक्टी-मरोड गावे समुद्रसपाटीपासून सुमारे ८ हजार फूट उंचीवर वसलेले. गावात जायचे झाल्यास डोंगराचा दुर्गम रस्ता लागतो. त्यात पावसाळी वातावरणामुळे दरडींचे संकट असते. गावची ही वाट ३५ किमी आहे. हे प्रवास कर्मचाऱ्यांनी पायी पूर्ण केला. त्यासाठी त्यांना सहा तास चालावे लागले. कर्मचाऱ्यांनी संपूर्ण गावाचे लसीकरण केले. कर्मचाऱ्यांनी अलीकडेच ४० जणांना डोस दिला. १५०० उंबऱ्यांच्या मलाणा गावात अजून कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. स्थानिक अधिकारी म्हणाले, मलाणा व शाक्टी-मरोड गावे आपल्या वेगळ्या कायद्यासाठी आेळखले जातात.
कॉमिक गावांत ३३० लोक : हिमाचलमधील सर्वात उंचीवरील पंचायत लांगजामध्ये ४५ वर्षांवरील सर्व लोकांना डोस देऊन झाला आहे. या पंचायतची लोकसंख्या ३३० आहे. त्याअंतर्गत तीन गावे येतात. त्यात कॉमिक, हिक्किम, लांगजाचा समावेश आहे. विशेष म्हणजे १५,५०० फूट उंचीवरील जगातील सर्वात उंच गावातील सर्व लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.