आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लसीकरण:50 व्या दिवसाच्या आधी देशात लसीकरण दोन कोटींच्या पुढे, सर्वाधिक रुग्ण, मृत्यू महाराष्ट्रात; लसीकरणात राजस्थान पुढे

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाविरोधातील लढाईत लसीकरणाचे ५० दिवस पूर्ण होण्याच्या एक दिवस आधीच देशात लसीकरणाचा आकडा दोन कोटीच्या पुढे गेला. १६ जानेवारीपासून सुरू लसीकरणाच्या ४९ व्या दिवशी शनिवारी देशात ११.६४ लाख डोस देण्यात आले व आकडा २.०६ कोटी झाला. मात्र, रुग्ण व मृत्यंूबाबत सर्वात पुढे असलेला महाराष्ट्र लसीकरणात १५.९७ लाख डोस देऊन चौथ्या क्रमांकावर आहे, तर रुग्णांत १० व्या क्रमांकावरील राजस्थान लसीकरणात अव्वल आहे. सर्वाधिक लोकसंख्येचा यूपी संसर्गात सहाव्या क्रमांकावर तर लसीकरणात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ६९.१५ लाख आरोग्य कर्मचारी व ६३.५५ लाख फ्रंटलाइन वर्कर्सना पहिला डोस देण्यात आला होता. ३३.५६ लाख आरोग्य कर्मचारी व १.४४ लाख फ्रंटलाइन वर्कर्सनी दुसरा डोस घेतला आहे.

दुसऱ्या देशांशी तुलना करता सर्वात आधी ८ डिसेंबरला लसीकरण सुरू करणाऱ्या ब्रिटनमध्ये ५० दिवसांत ८० लाख लसी देण्यात आल्या. इस्रायलमध्ये सुरुवात २७ डिसेंबरला झाली व ५० दिवसांत ६५ लाख डोस दिले. अमेरिकेत १४ डिसेंबरला सुरुवात झाली व ५० दिवसांत ३.३० कोटी डोस दिले. चीनने ५० दिवसांत ६.५ कोटी डोस दिल्याचा दावा केला होता.

हे गरजेचेच... दलाई लामांनी घेतला लसीचा पहिला डोस
हिमाचल सरकारच्या परवानगीनंतर शनिवारी सकाळी दलाई लामा यांना धर्मशाळेत विभागीय चिकित्सालयात लसीचा पहिला डोस देण्यात आला. लस घेतल्यानंतर त्यांनी लोकांना आवाहन केले की, गंभीर आजारांपासून बचावासाठी लस टोचून घ्या.

आरोग्य कर्मचारी : ५ राज्यांत १०० टक्क्यांना पहिला डोस
- लडाखसारखे लहान राज्य तसेच गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, झारखंडमध्ये १०० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला. २ मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार राजस्थानात ९५.६, म.प्र.मध्ये ९४.६, ओडिशात ९१.३४ व लक्षद्वीपमध्ये ९०.२५% आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला आहे.

- नऊ राज्यांत ७५%पेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस मिळाला.सिक्कीममध्ये ८५.७, ओडिशात ८०, तेलंगणा व हिमाचलात ७७, आंध्रात ७६ व छत्तीसगडमध्ये ७५.४%नी डोस घेतला.

बातम्या आणखी आहेत...