आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Vaccination Loud Across The Country !; There Will Be No Shortage Of Vaccines Now Claims The Center; News And Live Updates

महामोहीम:देशभरात लसीकरण जोरात!; आता लसींची टंचाई भासणार नाही - केंद्राचा दावा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • कोविन अॅपवर डोससाठी आतापर्यंत 32.24 कोटींहून अधिक लोकांनी नोंदणी केलेली आहे.

जागतिक योगदिनी, २१ जूनला सुरू झालेल्या लसीकरण महाअभियानात पहिल्या दिवशी ९०.८६ लाख डोसचा विश्वविक्रम नोंदला गेला. मंगळवारी हा वेग भलेही ४०% कमी झाला. परंतु, सरकारने केलेल्या दाव्यानुसार हा वेग यापेक्षा कमी होणार नाही. बुधवारच्या लसीकरणाचे आकडेही याला पुष्टी देणारे आहेत. मंगळवारी ५४.२२ लाख डोसच्या तुलनेत बुधवारी रात्री ११ वाजेपर्यंत ६४.४५ लाखांहून अधिक डोस दिले गेले होते. केंद्र सरकारच्या कोविन अॅपनुसार, आतापर्यंत एकूण २९,६७,८९,३०३ डोस दिले गेले आहेत. अर्थात बुधवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोशल मीडियावर ३० कोटींहून अधिक डोस दिले गेल्याचा दावा केला.

कोविन अॅपवर डोससाठी आतापर्यंत ३२.२४ कोटींहून अधिक लोकांनी नोंदणी केलेली आहे.
सूत्रांनुसार, राज्यांकडे सध्या १.९२ कोटी डोस शिल्लक आहेत. तीन दिवसांत ३९ लाखांहून अधिक डोस राज्यांना मिळतील. जूनच्या अखेरीस राज्यांकडे आणखी २ कोटी डोस आणखी पोहचतील. म्हणजे, राज्यांत रोज सरासरी ५० लाखांहून अधिक लोकांना डोस देण्याइतका साठा असेल. तत्पूर्वी एनटागीचे प्रमुख नरेंद्रकुमार अरोरा यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना देशात डोसची कमतरता नसल्याचे सांगितले. जुलैपासून दरमहा २० ते २२ कोटी डोस उपलब्ध होतील. वास्तविक, मंगळवारी २१ जूनच्या तुलनेत लसीकरणाचा वेग थोडा कमी झाल्यानंतर काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी सरकारच्या तयारीबाबत साशंकता व्यक्त केली होती.

दर तासाला सरासरी ५ लाख डोस, सर्वाधिक दुपारी १२ ते १ दरम्यान
बुधवारी देशात दर तासाला सरासरी ५.१७ लाखांपेक्षा जास्त डोस देण्यात आले. दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान सर्वाधिक १०,२०,१३० डोस देण्यात आले.

मप्र १७ लाखांवरून ५ हजारांवर आला, दुसऱ्याच दिवशी टॉपला
मध्य प्रदेशने २१ जूनला १७ लाखांपेक्षा जास्त डोस दिले. दुसऱ्याच दिवशी ४८२५ वर आले. पण राज्याने बुधवारी देशात सर्वाधिक ११,१७,२७७ डोस दिले.

इकडे, संसदीय समितीत लसीवरून वाद, भाजपचा सभात्याग
बुधवारी विज्ञान व तंत्रज्ञानावरील संसदीय समितीच्या बैठकीत पीएमचे वैज्ञानिक सल्लागार प्रा. के. विजय राघवन आणि डॉ. व्ही. के. पॉल यांना बोलावण्यात आले. काँग्रेसचे जयराम रमेश यांच्या अध्यक्षतेखालील ३१ सदस्यीय समितीत १३ सदस्य भाजपचे आहेत. काही सदस्यांनी लसीचे धोरण, किंमत व दोन डोसमधील अंतरावर प्रश्न विचारले तेव्हा भाजप सदस्यांनी आक्षेप घेतला. वाद झाल्यावर त्यांनी सभात्याग केला. अध्यक्षांनी समजूत घातल्यानंतरच ते परतले.

हाच वेग राहिल्यास १३८ दिवसांत १८+ च्या पूर्ण लोकसंख्येला लसीचा किमान १ डोस देता येणे शक्य
२३ जूनपर्यंत देशात २९.६६ कोटी लोकांना लसीचा किमान एक डोस देण्यात आला होता. देशात १८ वर्षांवरील लोकसंख्या सुमारे ९८ कोटी आहे. म्हणजे सुमारे ६८.३४ कोटी लोकांना अद्याप डोस देणे बाकी आहे. जर सध्याचा वेग कायम राखत दररोज सरासरी ५० लाख डोस देण्यात आले तर पुढील १३८ दिवसांत या पूर्ण लोकसंख्येला लसीचा किमान एक डोस मिळेल.

लसीकरणाची गती वाढण्यात भाजपशासित राज्यांचे योगदान जास्त आहे. काँग्रेस किंवा इतर पक्षांद्वारे शासित महाराष्ट्र, राजस्थान, प. बंगाल आणि ओडिशाही टॉप-१० मध्ये आहेत. राजस्थानचे म्हणणे आहे की, आम्ही उपलब्ध डोस दिले. गुरुवारी नवी खेप मिळाली नाही तर लसीकरण रोखावे लागेल.

बुधवारी लसीकरणात टॉप 10 राज्ये

 • मध्य प्रदेश 11,33,121
 • उत्तर प्रदेश 7,70,907
 • महाराष्ट्र 6,17,097
 • गुजरात 4,31,177
 • कर्नाटक 3,82,729
 • अासाम 3,54,660
 • प. बंगाल 3,39,393
 • राजस्थान 3,15,946
 • ओडिशा 3,02,279
 • बिहार 2,59,427
बातम्या आणखी आहेत...