आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:गुजरात-एमपीत 80% प्रौढांना लस, हे प्रमाण 8 अमेरिकी राज्यांपेक्षा जास्त, केवळ 10 दिवसांत चित्र बदलले...

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी शुक्रवारी देशात लसीकरणाचा नवा विक्रम झाला.एकूण २.५० कोटी लसी देण्यात आल्या. गुजरात व मध्य प्रदेशने ८०% पेक्षा जास्त प्रौढ लाेकसंख्येला (१८+) सिंगल डोस देण्याचा टप्पा गाठला. या राज्यांच्या उपलब्धीची तुलना केली तर लसीकरणात अग्रगण्य अमेरिकेच्या काही राज्यांत इतक्या मोठ्या प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण झालेले नाही. अमेरिकेच्या लुइझियाना, वेस्ट व्हर्जिनिया, मिसिसिपीसह ८ राज्यांत ७०% पेक्षा कमी प्रौढांना सिंगल डोस मिळाला आहे. भारतात मात्र ५ राज्यांनी ७०% पेक्षा जास्त लोकसंख्येला सिंगल डोस दिला आहे.

देशात एक सप्टेंबरला पहिल्यांदा एक कोटीपेक्षा जास्त डाेस देण्यात आले. यानंतर तीन वेळेस बार एक कोटीचा आकडा पार झाला. ऑगस्टच्या १७ दिवसांत रोज सरासरी ८७ लाख लसी दिल्या. हाच वेग कायम राहिल्यास दिवाळीपर्यंत देशातील ९०% प्रौढ लोकसंख्या दोन्ही डोसने कव्हर होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...