आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Vaccination Updates: 2.73 Lakh Counterfeit Remedies Seized In Gujarat; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेमडेसिवीरचा काळाबाजार:गुजरातमध्ये 2.73 लाख बनावट रेमडेसिवीर जप्त

नवी दिल्ली/गुरुग्राम9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन्ही आरोपी एक-एक रेमडेसिविर इंजेक्शन 70 हजार रुपयांत विकत होते.

गुजरातेत तब्बल २.७३ लाख बनावट रेमडेसिविर इंजेक्शन्स जप्त करण्यात आली आहेत. एकीकडे देशात रेमडेसिविरची प्रचंड टंचाई असताना दुसरीकडे बनावट इंजेक्शनची विक्री होत असल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, दिल्लीच्या फतेहपूर बेरी ठाण्याच्या पोलिसांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा भंडाफोड केला आहे. दाेन जणांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी एक-एक रेमडेसिविर इंजेक्शन 70 हजार रुपयांत विकत होते. त्यांच्याकडून तीन इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत.

दुसरीकडे, गुरुग्राममध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याच्या आरोपात एका महिलेसह तीन नर्सिंग स्टाफला अटक करण्यात आली आहे. हे लोक एक रेमडेसिविर इंजेक्शन ४५ हजार रुपयांत विकत होते.

बातम्या आणखी आहेत...