आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात कोरोना प्रतिबंधक लसींच्या पुरवठ्यावरून सुरू झालेला वाद चांगलाच पेटला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अदर पूनावाला यांनी सांगितले की ‘रात्रीतून लस उत्पादन वाढवू शकत नाही. ही (लसीचे उत्पादन) एक तांत्रिक कौशल्ययुक्त प्रक्रिया आहे. जुलैपर्यंत देशात लसीचा तुटवडा जाणवत राहील. जुलैत लसीचे उत्पादन ६-७ कोटींवरून वाढवून दरमहा १० कोटी डोस होईल. यामुळे पुरवठ्यात सुधारणा होण्याची आशा आहे.’
पूनावाला यांच्याकडून जारी निवेदनात म्हटले की, ‘भारत एक अवाढव्य लोकसंख्येचा देश आहे. येथील प्रत्येकासाठी पुरेशा डोसचे उत्पादन करणे सोपे नाही. आपण समजून घेतले पाहिजे की, जगातील विकसित आणि कमी लोकसंख्येच्या देशांनाही सध्या लसींच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे.’
अधिकाऱ्यांना लाटेचा अंदाज नव्हता, आॅर्डरनुसार उत्पादन वाढवले असते : सीरम
सीरम : २६ कोटी डोसची आर्डर, १७३२ कोटींचे पेमेंट
केंद्र : नव्या आर्डर दिल्या नाही, असे म्हणणे चुकीचे
केंद्राचा निर्णय : 100 दिवस कोरोना ड्यूटी करणाऱ्यांना प्राधान्य
पंतप्रधान मोदींनी डॉक्टर्स, नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वाढत्या गरजांचा सोमवारी आढावा घेतला. यानंतर १०० दिवसांची कोरोना ड्यूटी पूर्ण करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पंतप्रधान कोविड राष्ट्रीय सेवा सन्मान देण्याचा निर्णय घेतला. कोरोना ड्यूटीत मेडिकल इंटर्नच्या सेवा घेतल्या जातील. एमबीबीएस अंतिम वर्षाचे विद्यार्थी टेली कन्सल्टेशन आणि कोरोनाच्या कमी गंभीर रुग्णांच्या निगराणीचे काम करतील. त्यांना सरकार योग्य मानधनही देणार आहे. सरकारने नीट (पात्रता-सह-प्रवेश परीक्षा) पीजी-२०२१ किमान चार महिने लांबणीवर टाकण्याचाही निर्णय घेतला. आता ही परीक्षा ३१ ऑगस्टपर्यंत होणार नाही. नीट-पीजीच्या उमेदवारांना कोरोना ड्यूटीसाठी प्रोत्साहित करण्यास राज्यांना सांगितले जाईल.
पीजी मेडिकलच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थी नवीन बॅच येईपर्यंत कोरोना ड्यूटी सुरू ठेवतील. वरिष्ठ डॉक्टर्स व नर्सेसच्या मार्गदर्शनात बीएससी या जीएनएम पास नर्स फुल टाइम कोरोना ड्यूटी करत राहतील. ज्यांच्या शेवटच्या वर्षाचे निकाल येणे बाकी आहे त्याही नर्सेस कोरोना ड्यूटी करू शकतील. कोरोना व्यवस्थापनात किमान १०० दिवसांची ड्यूटी करणाऱ्यांना आगामी सरकारी भरतीत प्राधान्य दिले जाईल. कोरोना ड्यूटी करत असलेल्या विद्यार्थी व प्रोफेशन्सचे लसीकरण करण्यात येईल. त्यांना सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच्या विमा योजनेचाही लाभ मिळेल.
कोरोनामुळे आयपीएलमध्ये सामना स्थगित
कोलकाता नाइट रायडर्सचे (केकेआर) गोलंदाज वरुण चक्रवर्ती आणि संदीप वाॅरियर यांना कोरोना झाल्याने आयपीएलमधील ३० वी लढत स्थगित करावी लागली. वरुण अलीकडेच खांद्याच्या जखमेच्या स्कॅनसाठी बायो-बबलमधून बाहेर निघून ‘ग्रीन चॅनल’द्वारे रुग्णालयात गेला होता. सोमवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये कोलकाता नाइट रायडर्स आणि राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार होता. आयपीएलमध्ये प्रथमच एखादा सामना स्थगित करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.