आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vaccination Updates: Healthcare Workers Who Took Both Doses Of Covishield Are Now Also Taking Covacin; News And Live Updates

कर्नाटक व तामिळनाडूत प्रकार:​​​​​​​कोविशील्डचे दोन्ही डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी आता कोव्हॅक्सिनही घेत आहेत! बचावासाठी जास्तच सावधगिरी, लसींचे कॉकटेल

बंगळुरू/नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन्ही लसींच्या कॉकटेलबाबत अद्याप पुरेसा डेटा उपलब्ध नाही

आधीच लसीचा तुटवडा असताना कर्नाटक व तामिळनाडूतील अनेक आरोग्य कर्मचारी विनाकारण तिसरा डोस घेत आहेत. यासाठी ते वेगवेगळे फाेन नंबर आणि ओळखपत्रांद्वारे नावनोंदणी करत आहेत. वृत्तांनुसार, अनेक आरोग्य कर्मचारी काेविशील्डचे २ डाेस घेतल्यानंतर आता काेव्हॅक्सिनचीही लस घेत आहेत. काेराेनापासून बचावासाठी काेव्हॅक्सिन घेणेही गरजेचे असल्याचे ते सांगत आहेत. डाॅक्टरही त्यात काही वावगे नसल्याचे म्हणत आहेत.

त्यांच्यानुसार, “हे कर्मचारी व्हायरल लोड जास्त असलेल्या क्षेत्रात काम करतात. सुरुवातीस त्यांच्याकडे पर्याय नव्हता. आता दोन लसींबाबत भरपूर डेटा आहे.’ हा ट्रेंड फक्त कर्नाटकपर्यंतच मर्यादित नाही. तामिळनाडूचे व्हायरोलॉजिस्ट डॉ. टी. जेकब जॉन म्हणाले, आपणही राज्यात याबाबत एेकले आहे. वेगवेगळ्या लसी घेणे वैज्ञानिकरीत्या ठीक आहे. मर्यादेपेक्षा जास्त डोस असा प्रकार नसतो. कोविशील्डचे २ डाेस व कोव्हॅक्सिनची एक मात्रा घेणाऱ्यांना भावनिकरीत्या चांगले वाटेल.

उत्तर प्रदेश : ग्रामस्थांना एक डोस कोविशील्डचा, तर दुसरा कोव्हॅक्सिनचा

  • यूपीच्या सिद्धार्थनगर जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयात कोविशील्डचा पहिला डोस िदलेल्यांना दुसरा डाेस मात्र काेव्हॅक्सिनचा देण्यात आला. सुमारे २० लोकांसोबत असा प्रकार झाला आहे.
  • यापूर्वी एप्रिलमध्ये शामली िजल्ह्यात काही ग्रामस्थांना काेराेना लसीऐवजी अँटी रेबीज इंजेक्शन टोचले होते. कानपुरात एक एएनएमने मोबाइलवर बोलत बोलत एका महिलेला सलग दोन डोस टोचले होते.

लसीच्या प्रत्येक कुपीत एक डाेस जास्तीचा असतो
बंगळुरूच्या काही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, एका कुपीत १० डाेसचा लेखाजोखा द्यावे लागत असतो. मात्र प्रत्येक कुपीत ११ डाेस देता येईल इतकी मात्रा असते. सावधगिरीने लस टोचल्यास प्रत्येक कुपीतून एक डाेस वाचवता येऊ शकतो. आणि त्याचा लेखाजोखाही द्यावा लागत नाही. काही जण हाच अतिरिक्त डाेस टोचून घेत आहेत.

तज्ज्ञ म्हणतात, हे चुकीचे आहे आणि दुसऱ्याच्या हक्कावर घाला
कर्नाटकच्या कोविड- १९ तांत्रिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. एम.के. सुदर्शन यांनी म्हटले आहे की, आरोग्य कर्मचारी भीती आणि मजबूत सुरक्षेसाठी तिसरा अतिरिक्त डोस टोचून घेत आहेत. मात्र जे कुणी कर्मचारी असे करत आहेत, ते दुसऱ्या लाेकांच्या लस मिळवण्याच्या हक्कांवर घाला घालत आहेत. भारतात याबाबत कोणतेही दिशानिर्देश नाहीत.

भारत सरकारने तत्काळ दिशानिर्देश जारी करावेत
एका लसीचे दोन डोस घेतल्यानंतर दुसऱ्या कंपनीची लस घेणे अत्यंत चुकीचे आहे. हे थांबवण्यासाठी भारत सरकारने तत्काळ दिशानिर्देश जारी करायला हवे. दोन डोस पूर्ण झाल्यानंतर इतर कोणत्याही लसीची गरज नाही असे त्यात स्पष्ट सांगायला हवे. पहिला डोस कोविशील्ड वा कोव्हॅक्सिनचा घेतल्यानंतर दुसऱ्याच कंपनीचा दुसरा डोस टोचणे ही अक्षम्य बेपर्वाई आहे. असे करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जावी. वेगवेगळ्या कंपनीच्या लसी घेतल्यास फायदा होईल की नुकसान हेच अद्याप सिद्ध झालेले नाही.

एका कंपनीचे दोन्ही डोस पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या कंपनीचा डोस घेणे फायदेशीर आहे की हानिकारक, हेही अद्याप माहीत नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप वैज्ञानिकरीत्या मिळालेली नाहीत. एक मात्र स्पष्ट आहे की सर्वसाधारणपणे कोणत्याही लसीत असे काही गुणधर्म नसतात. - डॉ. प्रो. नरेंद्र अरोरा, चेअरमन, राष्ट्रीय समिती, एईएफआय (लसीकरणानंतरच्या साइड इफेक्ट्सची अध्ययन करणारी समिती.)

बातम्या आणखी आहेत...