आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Vaccination Updates: In India 13.84 Crore Doses Have Been Given To People; Vaccination News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लसीकरणाचे 100 दिवस:10% लोकसंख्येला पहिल्या डोसचे सुरक्षा कवच; देशात आतापर्यंत 13.84 कोटी डोस दिले

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वारंवार येणारी कोरोना लाट रोखण्यासाठी 70% लोकसंख्येला डोस आवश्यक

देशात कोरोनाविरुद्धच्या लसीकरण अभियानास रविवारी १०० दिवस पूर्ण होतील. २३ एप्रिलच्या रात्रीपर्यंत ११.६९ कोटी लोकांना १३.८४ कोटी डोस दिले गेले होते. दोन्ही डोस घेतलेल्या लोकांची संख्या सध्या २.१५ कोटी आहे. मात्र, ज्या गतीने डोस दिले जात आहेत, ते पाहता रविवारी रात्रीपर्यंत १४.३५ कोटी डोस दिले जातील. म्हणजे देशातील १०% लोकसंख्येला किमान एक डोस मिळालेला असेल.

दोन्ही डोस दिले गेल्याशंिवाय कोरोनापासून संपूर्ण सुरक्षा मिळणार नाही. तरी, नवीन अभ्यासानुसार डोस घेतल्यानंतर ज्या लोकांना संसर्ग झाला त्यांना रुग्णालयात भरती करण्याची गरज पडली नाही. म्हणजे एक डोस रुग्णाला गंभीर आजारापासून वाचवत आहे. म्हणूनच एक डोस घेतलेल्यांनाही सुरक्षा कवच मिळाले असे मानले जात आहे. तरी चिंता याची आहे की, १०० दिवसांत भारतात २ टक्के लोकसंख्येलाही दोन्ही डोस अजून मिळू शकलेले नाहीत.

जग : जेथे 20% हून अधिकलोकसंख्येला डोस तेथे नवे रुग्ण थांबले
इस्रायल 62.1%
ब्रिटन 49%
अमेरिका 40.6%
जर्मनी 22.1%
फ्रान्स 19.5%
तुर्की 15.2%
ब्राझील 11.9%
भारत 10%

  • इस्रायलमध्ये दोन दिवसांपूर्वी १५ महिन्यांनंतर कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. शाळा सुरू, मास्कचीही गरज नाही.
  • ब्रिटन व अमेरिकेत जेव्हा २०% लोकसंख्येला पहिला डोस मिळाला त्यानंतर नवे रुग्ण कमी होणे सुरू झाले. जर्मनीतही असेच आता नवे रुग्ण आढळणे कमी झाले.

सध्या रोज २४ लाख डोस दिले जाताहेत, येत्या दोन महिन्यांत होतील दुप्पट

आपण हे लक्ष्य कधी गाठू, या ५ मुद्द्यांनी समजून घ्या
1. १०० दिवसांत दिलेल्या डोसची सरासरी १३.८४ लाख/रोज अशी आहे. ती खूपच कमी आहे. हाच वेग राहिला असता तर लागली असती...
2. मात्र आता रोज दिल्या जाणाऱ्या डोसची सरासरी (७ दिवस मूव्हिंग) २४ आहे. याच धिम्या गतीने गेलो तर लागतील...
3. देशात दर महिन्याला ८ कोटी डोस तयार होत आहेत. हे सर्व डोस दर महिन्याला देशातच वापरले तर ७०% लोकसंख्येसाठी लागतील...
4. केंद्राचा असा दावा आहे की, जूननंतर देशात मासिक १२ कोटी डोस उत्पादन क्षमता होईल. सर्व डोस देशातच वापरले तर लागतील...
5. दोन महिन्यांत विदेशी डोस येतील. महिन्याला २ कोटी. म्हणजे १४ कोटी डोस दर महिन्याला उपलब्ध होतील. तेव्हा लागेल...

  • कारण 70% लोकसंख्येला दोन-दोन डोस देण्यासाठी लागतील १८२ कोटी डोस. १३.८४ कोटी डाेस दिले गेले आहेत. उर्वरित १६८ कोटी डोस एक वर्षात दिले जातील. म्हणजे एप्रिल 2022 पर्यंत भारत हे लक्ष्य गाठू शकतो.
  • डब्ल्यूएचओनुसार, कोणत्याही भागात राहणाऱ्या ७०% लोकसंख्येला लस दिली गेली तर तेथे संसर्गाची नवी लाट येणार नाही. म्हणजेच ७०% लोकसंख्येला हा डोस दिला जाईल तेव्हाच कोरोनाचा कायम नायनाट होईल अशी आशा.
बातम्या आणखी आहेत...