आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vaccination Updates In India: Central Government Declered Ages Of 18 And 44 Can Now Get Vaccinated By Registering At The Center; News And Live Updates

केंद्र सरकारचा दिलासा:आता 18 ते 44 वयोगटातील लोकांना केंद्रावर नोंदणी करून लस घेता येणार; भारतातही स्पुटनिक-व्हीचे उत्पादन सुरू

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या ही सुविधा 45 वर्षांवरील लोकांसाठीच उपलब्ध होती

आता १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांना ऑनलाइन नोंदणी न करताच कोरोना लसीचा डोस घेता येऊ शकेल. त्यांना थेट लसीकरण केंद्रावरच नोंदणीची सुविधा दिली आहे. सध्या ही सुविधा ४५ वर्षे व त्यावरील लोकांसाठी उपलब्ध होती. आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना जारी केलेल्या आदेशानुसार, १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांसाठी ऑन-साइट (लसीकरण केंद्र) नोंदणीची सुविधा सुरू करावी.

गर्दी होऊ नये याची काळजी घेण्यात यावी. ही सुविधा फक्त सरकारी लसीकरण केंद्रांवरच उपलब्ध असेल. खासगी केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरच लसीसाठी स्लॉट बुक होईल. सरकारने आधी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य केली होती. यामुळे इंटरनेट सुविधा नसलेल्यांना अडचणी येत होत्या. स्लॉट बुक केल्यानंतरही लोक येत नसल्याने डोसही वाया जात होते.

मुलांवर कोव्हॅक्सिन लसीची चाचणी जूनपासून सुरू होणार
भारत बायोटेक कंपनी येत्या जूनपासून कोव्हॅक्सिन लसीची मुलांवर चाचणी सुरू करत आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या या चाचणीत पहिल्या व २८ व्या दिवशी मुलांना डोस दिले जातील. या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत कंपनीला मुलांसाठीच्या लसीचा परवाना मिळेल, असा विश्वास भारत बायोटेकने व्यक्त केला आहे.

कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या डोसची चाचणी
कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या डोसची चाचणी एम्स दिल्ली व पाटण्यात सुरू झाली. दुसऱ्या डोसनंतर ६ महिन्यांनी ती दिली जाईल. दुसरा डोस सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० मध्ये देण्यात आला होता.

राज्यांना तीन दिवसांत मिळणार ४८ लाख डोस

  • राज्यांना पुढील ३ दिवसांत लसीचे आणखी ४८ लाख डोस दिले जातील. केंद्राने नि:शुल्क श्रेणी व थेट खरेदीद्वारे राज्यांना २१.८० कोटींपेक्षा जास्त डोस उपलब्ध करून दिले आहेत.
  • त्यापैकी २३ मेपर्यंत वाया गेलेल्या डोससह २० कोटी डोसचा वापर झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, राज्यांकडे अजूनही लसीचे १.८० कोटींवर डोस उपलब्ध आहेत.

भारतातही स्पुटनिक-व्हीचे उत्पादन सुरू, १० कोटी डोस
रशियाच्या स्पुटनिक-व्ही लसीचे देशात उत्पादन सुरू झाले. पॅनएशिया बायोटेक या खासगी कंपनीने रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडाशी (आरडीआयएफ) करार केला आहे. कंपनी देशात दरवर्षी १० कोटी डोस तयार करेल. कंपनीने तयार केलेल्या डोसची एक खेप रशियात पोहोचलीही आहे. तेथे तिची गुणवत्ता तपासणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...