आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना व्हॅक्सीनबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. अमेरिकेत येत्या 11 डिसेंबरपासून व्हॅक्सीनेशनला सुरुवात होणार आहे. तिकडे, ब्रिटेन, जर्मनीमध्येही डिसेंबरपासून अधिकृतरित्या लसीकरणाला सुरुवात होईल. दरम्यान, चाचणांमध्ये ऑक्सफोर्ड/एस्ट्राजेनेका व्हॅक्सीन (कोवीशील्ड) 90% पर्यंत परिणामकारक आहे.
भारताचे आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी इंडिया टुडेला सांगितले की, भारतात कोरोना व्हॅक्सीन 2021 च्या सुरुवातीच्या तीन महिन्यांच्या आत मिळेल. सप्टेंबर 2021 पर्यंत 25-30 कोटी भारतीयांना लस दिली जाईल. यात सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होईल.
ऑक्सफोर्डची लस 90% परिणामकारक
ऑक्सफोर्ड/एस्ट्राजेनेकाने सांगितले की, यूके आणि ब्राझीलमध्ये केलेल्या परिक्षणांमध्ये व्हॅक्सीन (AZD1222) बऱ्यापैकी परिणामकारक आढळून आली आहे. अर्धा डोज दिल्यावर व्हॅक्सीन 90% पर्यंत परिणामकारक आढळली. यानंतर दुसऱ्या महिन्यात पूर्ण डोज दिल्यानंतर 62% परिणामकारक दिसली. याच्या दोन महिन्यानंतर दोन डोज दिल्यावर व्हॅक्सीनचा 70% चांगला परिणाम जाणवला. ही लस पुण्यातील सीरम इंस्टीट्युट ऑफ इंडिया तयार करत आहे.
अमेरिकेत 11 डिसेंबरपासून व्हॅक्सीनेशन
संक्रमण आणि मृत्यूच्या बाबतीत अमेरिका सर्वात पुढे आहे. यूएस कोविड-19 व्हॅक्सीन टास्कचे हेड मोन्सेफ सलोईने CNN ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, अमेरिकेत येत्या 11 डिसेंबरपासून व्हॅक्सीनेशला सुरुवात होईल. फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA)ने व्हॅक्सीनला मंजूरी दिल्यानंतर आम्ही नागरिकांना लस देण्याची काम सुरू करणार आहोत.
5 प्रमुख व्हॅक्सीनचे स्टेटस
व्हॅक्सीन | सध्याची स्थिती | कधी येईल | किंमत प्रती डोज |
मॉडर्ना (अमेरिका) | इमरजंसी यूजची तैयारी, 94.5% पर्यंत परिणामकारक | डिसेंबरपर्येत येऊ शकते. | 1850-2750 रु |
फाइजर (अमेरिका) | इमरजंसी यूजला परवानगी, 95% पर्यंत परिणामकारक | डिसेंबरपर्यंत येऊ शकते. | 1450 रु |
ऑक्सफोर्ड/एस्ट्राजेनेका (ब्रिटेन) | UK-ब्राझीलमधील चाचण्यांमधील 90% पर्यंत परिणामकारक | फेब्रुवारीमध्ये येण्याची शक्यता. | 500-600 रु |
कोवैक्सिन (भारत) | तीसरा ट्रायल सुरू | अंदाजे 26 हजार लोकांवर ट्रायल होईल. | - |
स्पुतनिक V (रशिया) | दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजमधील ट्रायल सुरू. | दोन डोज दिले जातील. | - |
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.