आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:केवळ 2 महिन्यांत 48 कोटी डोसमुळे सुरक्षित होतील सणवार; 8 महिन्यांत 62 कोटी डोस दिले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वीलेखक: पवन कुमार
  • कॉपी लिंक
  • दिवाळीपर्यंत बहुतेक राज्यांत 85% प्रौढांना लसीचा पहिला डोस मिळण्याची अपेक्षा वाढली

सणवार सुरू होताच कोरोनाविरुद्ध लसीकरणाची गतीही वाढेल. आजवर एका महिन्यात दिल्या जाणाऱ्या डोसची संख्या १४ कोटींवर गेली नव्हती. आता ही संख्या २३ कोटींवर जाऊ शकते. कारण, सप्टेंबर २३ कोटी, ऑक्टोबरमध्ये २५ कोटी डोस तयार होतील. यात ४० कोटी कोविशील्ड, ६ कोटी कोव्हॅक्सिन व २ कोटी झायकोव्ह-डीचे असतील. म्हणजे दोन महिन्यांत ४८ कोटी डोस मिळतील. यात बहुतांश राज्यांतील ८५% प्रौढ लोकसंख्या कव्हर करण्याचे लक्ष्य आहे.

तथापि, प. बंगाल, यूपी, बिहार, पंजाब आणि झारखंड या स्पर्धेत मागे पडू शकतात. कारण तेथे आजवर ४०% प्रौढांना पहिला डोस मिळाला आहे. तर गुजरात, केरळ, मध्य प्रदेशसह १४ राज्यांत ६०% पेक्षा अधिक प्रौढांना पहिला डोस मिळाला आहे. त्यामुळे या राज्यांत दिवाळीपर्यंत ८५% लोकसंख्या कव्हर होऊ शकते.

केंद्राने राज्यांना म्हटले- सणवारांदरम्यान मोठी गर्दी होऊ देऊ नका
केंद्र सरकारने काेविड गाइडलाइन्स ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. शिवाय राज्यांना सांगितले की, ‘सणवारांदरम्यान विशेष काळजी घेतली जावी. संक्रमण पसरू नये यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ देऊ नये. कार्यक्रमांतील गर्दी रोखण्यासाठी स्थानिक स्तरांवर कठोर निर्बंध लावले जाऊ शकतात.

लोकसंख्येनुसार सर्वात जास्त डोस गुजरातमध्ये दिले, परंतु एका महिन्यात सर्वात जास्त २६% वाढ मध्य प्रदेशमध्ये

  • गुजरात, केरळ, मध्य प्रदेश लोकसंख्येनुसार लसीकरणात टॉप-३ राज्ये ठरली. केवळ याच तीन राज्यांत मागील एका महिन्यात सिंगल डोस घेणारे २० % हून अधिक लोक जोडले गेले.
  • अशीच गती राहिली तर या ३ राज्यांत दिवाळीपूर्वी पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ९५% होऊ शकते. हिमाचलसह ७ लहान राज्यांत ९०% प्रौढांना पहिला डोस मिळाला आहे.

शाब्बास वॉरिअर्स

  • 99% हेल्थकेअर वर्कर्सना पहिला
  • 83% लोकांना दोन्ही डोस मिळाले
  • 100% फ्रंटलाइन वर्कर्सना पहिला
  • 79% लोकांना दोन्ही डोस मिळाले
बातम्या आणखी आहेत...