आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vaccine Certificate Will Have Mamata Banerjee Photo Instead Of Narendra Modi In Bengal

फोटोवरून भिडले राजकारणी:लोकांना लस मिळत नसताना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर फोटो कुणाचा यावरून वाद; बंगालमध्ये मोदींचा फोटो हटवून ममतांनी लावला स्वतःचा फोटो, भाजपचा तीव्र आक्षेप

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात लसीकरणाचा वाद सुप्रीम कोर्टातही चर्चेत आहे. लोकांना का मिळत नाहीत, देशात तयार होणाऱ्या किंवा परदेशातून आलेल्या लसी जातात कुठे असा सवाल सुप्रीम कोर्टात आणि सामान्य जनतेकडून विचारला जात आहे. पण, केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारमध्ये वेगळाच लढा सुरू आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता आपल्या राज्यात होणाऱ्या लसीकरणात दिल्या जाणाऱ्या सर्टिफिकेटवर स्वतःचा फोटो लावण्याचा निर्णय घेतला. त्यावर केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीपासून भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्यातील वाद राष्ट्रीय पातळीवर चर्चेचे ठरत आहेत. बैठकांमध्ये उशीरा पोहोचण्याचा विषय असो की अधिकाऱ्यांवरील कारवाई सर्वच प्रकरणांत केंद्र आणि पश्चिम बंगाल सरकार समोरासमोर येत आहेत. त्यात आता व्हॅक्सीनेशनच्या सर्टिफिकेटवर कुणाचा फोटो हवा यावरून वाद सुरू झाला. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी आपल्या राज्यात होणाऱ्या लीकरणात सर्टिफिकेटवर स्वतःचा फोटो लावण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत लसीकरणानंतर नागरिकांना दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रांवर देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच फोटो लावला जात आहे.

व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेटवरून पश्चिम बंगालमध्ये नवा वाद सुरू झाल आहे. व्हॅक्सीनेशनच्या तिसऱ्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये प्रमाणपत्रांवर मोदींचा फोटो दिसणार नाही. पश्चिम बंगाल सरकारच्या या निर्णयावर भाजपने संताप व्यक्त केला. भाजप प्रवक्ते समिक भट्टाचार्य म्हणाले, की तृणमूल काँग्रेसला पंतप्रधान पदाचे गौरव वाटत नाही. पश्चिम बंगाल जणू एका देशासारखे वर्तन करत आहे. तृणमूल काँग्रेस हे मान्य करायला तयार नाही की पश्चिम बंगाल भारताचेच राज्य आहे.

निवडणुकीतही गाजला होता फोटोचा मुद्दा
पश्चिम बंगामलध्ये नुकतेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेटवर मोदींच्या फोटोवरून वाद झाला होता. तृणमूल काँग्रेसने हा मुद्दा प्रचारात उपस्थित करून यास आचारसंहितेचे उल्लंघन म्हटले होते. एवढेच नव्हे, तर निवडणूक आयोगाकडे तक्रार सुद्धा केली होती. निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा तृणमूलची सत्ता आली. त्यानंतर भाजर जर असे करू शकत असेल तर आम्ही का करू नये म्हणत ममतांनी सुद्धा त्यावर आपलाच फोटो लावण्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...