आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशभरात लसीकरणाचा तिसरा टप्पा गुरुवारपासून सुरू झाला. पहिल्या दिवशी 45 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या 15 लाख 28 हजार 639 लोकांना लस देण्यात आली. आरोग्य मंत्रालयानुसार 1 एप्रिल रात्री 8 वाजेपर्यंत देशभरात एकूण 6.75 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. यामध्ये 45 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या 4 कोटी 1 लाख 6 हजार 304 लोकांचाही समावेश आहे.
देशातील लसीकरणाच्या 76 व्या दिवशी एकूण 17 लाख 47 हजार 94 लोकांना लस देण्यात आली. यात 16 लाख 20 हजार 746 लोकांना पहिला डोस मिळाला तर 1 लाख 26 हजार 348 जणांना दुसरा डोस मिळाला.
आतापर्यंतच्या लसीकरणाचा संपूर्ण तपशील
आतापर्यंत 88 लाख 48 हजार 558 आरोग्य कर्मचाऱ्यांना देशभरात पहिला डोस देण्यात आला आहे. 52 लाख 63 हजार 108 आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. 93 लाख 99 हजार 776 फ्रंट लाइन वर्कर्सना पहिला डोस आणि 39 लाख 18 हजार 646 लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून सुरू झाली
देशभरात लसीकरण मोहिमेअंतर्गत लसीकरणाचा पहिला टप्पा 16 जानेवारी रोजी सुरू झाला. प्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश होता. यानंतर 2 फेब्रुवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्स म्हणजेच पोलिस, सफाई कामगारांचा समावेश होता. यानंतर 1 मार्चपासून 60 वर्षांवरील सर्व लोक आणि 45 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे लोक जे गंभीर आजारांनी पीडित होते, त्यांना व्हॅक्सीन देण्यात आली.
या महिन्यात दररोज दिली जाणार लस
देशात कोरोनाच्या वाढत्या घटनांदरम्यान केंद्र सरकारने एप्रिलमध्ये दररोज लसीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्राने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना सरकारी सुट्टीच्या दिवशीही सरकारी व खासगी केंद्रांवर लसी देण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
100% लसीकरण सुनिश्चित करण्यात यावे
दुसरीकडे, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी एक दिवसांपूर्वी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून म्हटले आहे की, ज्या जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त रुग्णांची नोंद आहे अशा जिल्ह्यांमध्ये 45 वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांचे 100 टक्के लसीकरण केले जावे. त्यांनी असेही म्हटले आहे की या टप्प्यावर कोणताही निष्काळजीपणा घातक ठरू शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.