आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Vaccine India Update; Bharat Biotech COVAXIN | Ground Report From Hyderabad Genome Valley

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हैदराबादच्या जीनोम व्हॅलीमधून ग्राउंड रिपोर्ट:कोरोना व्हॅक्सीन बनवणाऱ्या तीन मोठ्या कंपन्या याच ठिकाणी; 15 हजार शास्त्रज्ञ, तर 200 कंपन्या, वर्षभरात तयार होतात 6 अब्ज डोज

हैदराबाद22 दिवसांपूर्वीलेखक: अक्षय बाजपेयी
  • कॉपी लिंक
  • हैदराबादपासून 40 किमी दूर जीनोम व्हॅली आहे, येथे भारत बायोटेक, बायोलॉजिकल ई आणि इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड कोरोना व्हॅक्सीन तयार करत आहे

हैदराबादमधील जीनोम व्हॅलीमधून ग्राउंड रिपोर्ट. आमचे प्रतिनिधी अक्षय बाजपेयी यांच्या शब्दात. मी हैदराबादला गेलो होतो. तिथि गेल्यावर मी सर्वात आधी शहरापासून 40 किलोमीटर दूर असलेल्या जीनोम व्हॅलीला गेलो. याच ठिकाणी देशातील तीन सर्वात मोठ्या कंपन्या व्हॅक्सीन तयार करत आहेत. यात भारत बायोटेक, बायोलॉजिकल ई आणि इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड सामील आहेत.

जीनोम व्हॅलीमधील भारत बायोटेक कंपनी. या ठिकाणी कोरोनाची कोव्हॅक्सिन लस तयार होत आहे.
जीनोम व्हॅलीमधील भारत बायोटेक कंपनी. या ठिकाणी कोरोनाची कोव्हॅक्सिन लस तयार होत आहे.

जीनोम व्हॅलीत एंट्री मिळवणे अवघड नाही, कारण व्हॅलीमधून एक रस्ता एका गावाला जातो आणि दररोज या रस्त्यावर लोकांची गर्दी असते. पण, व्हॅलीतील कंपनीमध्ये एंट्री मिळवणे अवघड आहे. या तीन कंपनीपैकी एक असलेल्या भारत बायोटेकमध्ये काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिजीट दिली होती. तेव्हापासून या ठिकाणी सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. 600 वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेल्या या व्हॅलीला देशातील सर्वात मोठा लाइफ सायंसेज क्लस्टर म्हटले जाते. जीनोम व्हॅलीचे आशियातील टॉप लाइफ सायंसेज क्लस्टरमध्ये सामीलआहे. येथून 100 पेक्षा जास्त देशांना व्हॅक्सीनचा पुरवठा केला जातो.

बायोलॉजिकल ई कंपनी
बायोलॉजिकल ई कंपनी

सर्वात आधी मी भारत बायोटेकच्या फॅक्टरीसमोर गेलो. येथील सुरक्षा रक्षकाने मला कंपनीत जाऊ दिले नाही. त्याने सांगितले की, फक्त कंपनीचे कर्मचारी आत जाऊ शकतात. याशिवाय ज्यांना परवानगी मिळाली आहे, अशाच लोकांना आम्ही आत सोडतो. भारत बायोटेकने जुलैपासून नोव्हेंबरपर्यंत आपल्या व्हॅक्सीन तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांना गेस्ट हाउसमध्येच ठेवले होते. डिसेंबरपासून त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. जीनोम व्हॅली शहरापासून खूप दूर आहे, यामुळेच कंपनीतील सर्व कर्मचारी कंपनीच्या बसमधून येणे-जाणे करतात. भारत बायोटेकपासून काही अंतरावर बायोलॉजिकल ई या कंपनीची फॅक्टरी आहे. या कंपनीतही बाहेरील लोकांना एंट्री नाही.

इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड
इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड

15 हजार शास्त्रज्ञ, 6 अब्ज डोज वर्षभरात तयार होतात

जीनोम व्हॅलीमध्ये अॅग्रीकल्चर-बायोटेक, क्लीनिकल रिसर्च मॅनेजमेंट, बायोफार्मा, व्हॅक्सीन मॅन्यूफॅक्चरिंग, रेग्युलेटरी अँड टेस्टिंग करणाऱ्या 200 पेक्षा जास्त कंपन्या आहेत, यामुळेच याला लाइफ सायंसेज क्लस्टर म्हटले जाते.

तेलंगाणा सरकारच्या लाइफ सायंसेज आणि फार्माचे डायरेक्टर शक्ती नागप्पन यांना मी जीनोम व्हॅलीबाबत विचारल्यावर त्यांनी सांगितले की, 'काही दिवसांपूर्वी आम्ही एक सर्वे केला होता. त्यात समजले की, जीनोम व्हॅलीमध्ये 15 हजारांपेक्षा जास्त सायंटिफिक वर्कफोर्स आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या लाखो लोकांना यातून रोजगार मिळतो. रिपोर्टनुसार, येणाऱ्या दहा वर्षात येथे चार ते पाच लाख नोकऱ्या तयार होतील.

आशियातील टॉप फार्मा क्लस्टरमध्ये आहे नाव

मी विचारले की, जीनोम व्हॅलीमधून वर्षभरात किती औषधे तयार होतात ?त्यावर ते म्हणाले की, 'व्हॅक्सीनचे सहा अब्ज डोज या ठिकाणी तयार होतात. यात विविध आजारांच्या लस सामील आहेत.' पुढे मी विचारले की, असे म्हटले जाते की, जीनोम व्हॅलीमधून जगातील अर्ध्या लोकसंख्येला औषधे पुरवले जातात ? यावर ते म्हणाले की, 'हा आकडा कुठून आला, मला माहीत नाही. पण, जीनोम व्हॅली आशियातील टॉप लाइफ सायंसेज क्लस्टरपैकी एक आहे.'

डॉ. ऐल्लाने दिली होती बायोटेक नॉलेज पार्क बनवण्याची कल्पना

जीनोम व्हॅलीला बनवण्यामागे भारत बायोटेकचे एमडी डॉ. कृष्णा एम ऐल्ला यांचे योगदान आहे. त्यांनी 1996 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना बायोटेक नॉलेज पार्क बनवण्यासाठी प्रेजेंटेशन दिले होते. यानंतर आंध्रप्रदेश इंडस्ट्रियल इंफ्रास्ट्रक्चर कॉरपोरेशनद्वारे नॉलेज पार्कसाठी जमीन देण्यात आली.

हा भारतासाठी एकदम नवीन कॉन्सेप्ट होती, यामुळे सरकारनेही यात रस दाखवला. भारत बायोटेकचा हेपेटायटिस व्हॅक्सीन प्लांटदेखील सर्वात आधी येथेच स्थापन झाला. नंतर ICICI नॉलेज पार्क आणि दुसऱ्या अनेक कंपन्या या ठिकाणी आल्या आणि याचे नाव जीनोम व्हॅली झाले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser